शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

नागपूर मनपातील भाड्याची वाहने : निविदा उघडल्यानंतर पुन्हा दराची विचारणा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 12:10 AM

महापालिकेत भाड्याने वाहने घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात निविदा उघडण्यात आल्या. परंतु तीन महिने झाले तरी अद्याप वाहनांचे भाडे निश्चित करण्यात आलेले नाही. वास्तविक कमी दराच्या निविदा सादर करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही निविदा सादर करणाऱ्यांना पत्र पाठवून वाहनांच्या भाड्याबाबतच विचारणा केली जात आहे. तुम्ही कमीतकमी भाड्याने वाहन देणार का, देणार असाल तर यासाठी किती भाडे द्यावे लागेल. अशा स्वरुपाची विचारणा केली जात आहे. प्रशासनाकडून प्रश्नांचा भडीमार सुरू आहे. टॅक्सी चालकांच्या मर्जीनुसारच भाडे निश्चित करावयाचे होते तर मग निविदा कशासाठी काढण्यात आल्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देआॅपरेटरला सात महिन्यापासून मिळत आहे मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत भाड्याने वाहने घेण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात निविदा उघडण्यात आल्या. परंतु तीन महिने झाले तरी अद्याप वाहनांचे भाडे निश्चित करण्यात आलेले नाही. वास्तविक कमी दराच्या निविदा सादर करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही निविदा सादर करणाऱ्यांना पत्र पाठवून वाहनांच्या भाड्याबाबतच विचारणा केली जात आहे. तुम्ही कमीतकमी भाड्याने वाहन देणार का, देणार असाल तर यासाठी किती भाडे द्यावे लागेल. अशा स्वरुपाची विचारणा केली जात आहे. प्रशासनाकडून प्रश्नांचा भडीमार सुरू आहे. टॅक्सी चालकांच्या मर्जीनुसारच भाडे निश्चित करावयाचे होते तर मग निविदा कशासाठी काढण्यात आल्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेत भाड्याने असलेल्या वाहनांचा करारनामा संपला आहे. मागील सात महिन्यापासून टॅक्सी चालकांना वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने सामान्य प्रशासन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्तापक्षातील एका ज्येष्ठ नगरसेवकांच्या आशीर्वादाने नवीन टॅक्सी चालकांना संधी मिळावी. यासाठी निकषात सवलत देण्यात आली होती. यासंदर्भात लोकमत ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी अपर आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. चौकशीनंतर पात्र निविदा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.टॅक्सी परवाना असलेल्या चारचाकी वाहने भाड्याने घेण्याबाबत मे महिन्यात निविदा काढण्यात आली होती. राज्य शासनाच्या वेबसाईटच्या माध्यमातून निविदा काढण्यात आली. परंतु यातील शर्थी व अटी वादग्रस्त होत्या. असे असूनही चौकशीनंतर निविदा उघडण्यात आल्या. यातील निकषात न बसणाºया ३४ निविदा वगळून उर्वरित निविदा उघडण्यात आल्या. यात सिडान वाहनाचे किमान भाडे २१ हजार प्रति महिना, हॅचबॅच वाहनाचे किमान भाडे २१ हजार ५०० रुपये व व्हॅन प्रकारातीलकारचे भाडे किमान २६ हजार रुपये आले. सर्वात कमी दराच्या निविदा सादर करण्याºया टॅक्सी चालकांच्या निविदा मंजूर होणे अपेक्षित होते. परंतु सामान्य प्रशासन विभागाने असे न करता त्यांना पत्र पाठवून आॅपरेटरला पुन्हा भाड्याचे दर पाठविण्यास सांगितले आहे....तर ५० लाख वाचले असतेजीएसटी लागू झाल्यानतंर जुन्याच दराने टॅक्सी भाड्याने ठेवण्याच्या पर्यायावर चर्चा करण्यात आली. जुन्या दराने टॅक्सी चालल्या असत्या तर वर्षाला महापालिकेच्या खर्चात ५० लाखांची बचत झाली असती. परंतु नवीन निविदा काढण्यात आल्या. त्यातही वाटाघाटी व तडजोडीचे प्रकार सुरू असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.टॅक्सी ओनर्स असोसिएशनचा आक्षेपसामान्य प्रशासन विभागाने पत्र जारी करण्यावर आॅरेंज सिटी टॅक्सी ओनर्स असोसिएशनने आक्षेप नोंदविला आहे. यासंदर्भात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्ता पक्षनेते, विरोधी पक्षनेते व अपर आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. सर्वात कमी दराच्या निविदा मंजूर करण्यात याव्या, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष सुभाष घाटे यांनी केली आहे. टॅक्सीचालकांना पत्र पाठवून भाडे विचारणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcarकार