लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या बंद पडलेल्या शाळांच्या वर्गखोल्या डम्पिंग यार्ड बनल्या आहेत. असामाजिक तत्त्वांनी तिथे अड्डे बनविले आहे. इमारतीचा दुरुपयोग होत आहे. या शाळांमध्ये सर्वत्र घाण, कचरा, वर्गखोल्यांमध्ये भंगार पडलेल्या टेबल-खुर्च्या असतानाही याकडे कुणाचेही लक्ष नाही. मनपाने या इमारतीचा वापरसुद्धा केलेला नाही. उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या याचिकेनंतर न्यायालयाने निर्देश दिल्यामुळे याची पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे ही अवस्था मनपाच्या निदर्शनास आली आहे.मनपाच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसोबत अखिल भारतीय दुर्बल समाज विकास संसाधन संस्थेचे कार्यकर्ते पाहणीत सहभागी झाले होते. गोळीबार चौकातील नेताजी सुभाष चंद्र बोस शाळेत त्यांनी भेट दिली असता. येथे केवळ चौथा वर्ग होता. त्यातही चारच विद्यार्थी होते. एक शिक्षिका होती. शाळेची पुरती दुरावस्था झालेली आढळली.जागनाथ बुधवारी येथील बंद पडलेली मराठी कन्या शाळेत जनावरांचा गोठा आढळला. याच इमारतीत ठेकेदाराने कब्जा करून त्याच्या मजुरासाठी वास्तव्य केले होते. हे मजूर ठेकेदाराला पैसेही देत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.बंगाली पंजा येथील २००४ पासून बंद पडलेल्या हिंदी उच्च प्राथमिक शाळेत डेकोरेशनचे साहित्य, परिसरातील लोकांच्या वाहनांची पार्किंग व सामुहिक कार्यासाठी इमारतीचा उपयोग होत असल्याचे आढळले.
शाळेच्या इमारतीचा वापर व्हावामनपाने शाळा बंद करून या इमारती भंगारासारख्या सोडल्या आहेत. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे व इंग्रजी माध्यमाच्या अट्टाहासापोटी मनपाच्या शाळांची ही अवस्था झाली आहे. या मोठमोठ्या इमारतींची दुरुस्ती करून या इमारतीत पुन्हा अध्यापनाचे कार्य सुरू व्हावे, या भावनेतून अ.भा. दुर्बल समाज विकास संसाधन संस्थेने याचिका दाखल केली होती. बंद पडलेल्या या शाळा पुन्हा सुरू व्हाव्यात, ही अपेक्षा आहे.धीरज भिसीकर, सचिव, अ.भा. दुर्बल समाज विकास संसाधन संस्था