शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपुरात डीजेवर नाचण्याच्या वादातून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 10:51 PM

डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून त्याची हत्या केली. त्याच्या बचावासाठी धावलेल्या एका तरुणालाही आरोपींनी गंभीर जखमी केले.

ठळक मुद्देरिसेप्शन सुरू असताना बाजूला घडला थरार : अजनीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डीजेवर नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून त्याची हत्या केली. त्याच्या बचावासाठी धावलेल्या एका तरुणालाही आरोपींनी गंभीर जखमी केले.मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास अजनीतील धोबी घाट चौकाजवळ ही थरारक घटना घडली. आशुतोष बाबुलाल वर्मा (वय २५, रा. नवीन बाबुलखेडा, धोबी घाट) असे मृत तरुणाचे तर, शुभम नलिन कांबळे (वय २३) असे जखमीचे नाव आहे.बुधवारी २० मे रोजी रामटेक येथे मित्राच्या लग्नात आशुतोष अन्य मित्रांसह गेला होता. तेथे डीजेवर नाचताना ललित ऊर्फ काल्या प्रवेश प्रजापती (वय १९) आणि मनीष ऊर्फ मंशा अशोक रवतेल या दोघांना आशुतोषचा धक्का लागला. या कारणावरून आशुतोषचा ललित तसेच मंशासोबत वाद झाला. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. ललित आणि मंशाने त्याला नागपुरात चल तुझा गेम वाजवतो, अशी धमकी दिली.मंगळवारी सायंकाळी लग्नानंतर रिसेप्शनच्या कार्यक्रमात आशुतोषचा शुभम कटोतेसोबत पुन्हा वाद झाला. त्यावेळी तो कसाबसा सुटला. जेवण झाल्यानंतर आशुतोष घरी गेला. शुभमने आशुतोषला फोन केला. एक मॅटर सलटाने का है, जल्दी चौक मे आ’ असे म्हणत आशुतोषला बोलावून घेतले. तिकडे त्याने ललित आणि मंशा तसेच अन्य आरोपींना आशुतोषला बोलावल्याचे सांगितले. आशुतोष त्याचा मित्र शुभमला घेऊन धोबी घाट चौकात गेला. तेथे शुभम आणि ललित, मंशा, विनू मेश्राम आणि अन्य दोन आरोपी शस्त्र घेऊन होते. एकाने आशुतोषच्या गळ्यात हात घालून त्याला धोबीघाटाकडे नेले. अंधारात नेल्यानंतर आरोपींनी आशुतोषवर प्राणघातक हल्ला चढवला. ते पाहून शुभम कांबळे मदतीला धावला असता आरोपींनी त्यालाही जखमी केले. आशुतोषला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी पळून गेले. शुभमने त्याच्या मित्रांना फोन करून तेथे बोलावून घेतले. त्या सर्वांनी आशुतोषला मेडिकलला नेले. तेथे उपचारादरम्यान आशुतोषचा मृत्यू झाला. एकुलत्या एका मुलाची हत्या झाल्याने आशुतोषच्या आईवडिलांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्यांची प्रकृती गंभीर झाली आहे.त्याची धडपड व्यर्थमित्राला रक्ताच्या थारोळ्यात लोळविणाऱ्या आरोपींना तातडीने अटक व्हावी म्हणून शुभम जखमी अवस्थेतच अजनी ठाण्यात पोहचला. आरोपींना तातडीने अटक करा, अशी विनंती त्याने पोलिसांना केली. मात्र, त्याची धडपड व्यर्थ ठरली. पोलिसांनी वेळकाढू धोरण अवलंबले. त्यामुळे आरोपींना पळून जाण्यास वेळ मिळाला. दरम्यान, आशुतोषच्या हत्येच्या आरोपात अजनी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी दोघांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून