शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

नागपूर हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 4:09 AM

- श्वेता पेंडसे : राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘बार्डो’ची पटकथाकार, संवादलेखिका, गीतकार व अभिनेत्री अंकिता देशकर / लोकमत न्यूज ...

- श्वेता पेंडसे : राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘बार्डो’ची पटकथाकार, संवादलेखिका, गीतकार व अभिनेत्री

अंकिता देशकर / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दोन दिवसापूर्वी ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार- २०१९ची घोषणा झाली. यात उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून ‘बार्डो’ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. मात्र, हा चित्रपट नागपूरकर कलावंतांशी निगडित आहे, याची माहिती फार थोड्या जणांना आहे. या चित्रपटाची पटकथा, संवाद व गीत नागपुरातील गुणी अभिनेत्री, नाट्यदिग्दर्शक, नाट्यलेखिका डॉ. श्वेता पेंडसे हिने लिहिले आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटात तिने भूमिकाही साकारली आहे. याच चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सावनी रवींद्र या गायिकेला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आणि हे गाणे श्वेता पेंडसे यांनीच लिहिले आहे.

डॉ. श्वेता पेंडसे यांनी चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक भीमराव मुडे यांच्यासोबत चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. दहा वर्षापूर्वी मुंबईत स्थायिक झालेल्या श्वेताने लोकमतशी संवाद साधताना ‘नागपूर ही माझी जन्मभूमी आणि हीच माझी कर्मभूमी’ असल्याचे सांगितले. श्वेता यांनी शहरातच रसायनशास्त्रात डॉक्टरेट पूर्ण केले. या चित्रपटातील अनेक लोक नागपूरशी संबंधित असून, त्याचा अभिमान वाटतो. ‘बार्डो’ हा सिनेमा अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत प्रदर्शित करण्यात आला. मात्र, चित्रपटाची दखल घेतली जात नसल्याने निराशा हाती लागत होती. अशात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने उल्हासित झालो आहोत. हा कोण्या एका व्यक्तीचा नव्हे तर सामूहिक प्रयत्नांचा पुरस्कार असल्याची भावना श्वेता पेंडसे यांनी व्यक्त केली. ‘बार्डो’ हा पटकथा लिहिण्याचा दुसरा प्रयत्न आहे. यासोबतच विदर्भाची पार्श्वभूमी असलेले व उच्चारांचा समावेश असलेले गाणे लिहिण्याचा योग मी विदर्भातील असल्यामुळे आला. गीत लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता आणि त्याला रोहण-रोहण या अद्भुत संगीतकाराचा स्पर्श झाला आहे. या चित्रपटाला आम्ही आमच्या पोटच्या बाळासारखे साकारले आहे. हा चित्रपट आईन्स्टाईनच्या ‘थेअर ऑफ ड्रीम रिलेटिव्हिटी’ या संकल्पनेवर आधारित आहे. विज्ञान विषयातील माझा अभ्यास चित्रपटाची पटकथा लिहिण्यात लाभदायक ठरल्याचे त्यांनी सांगितले.

----------------

‘रान पेटलं’ या गाण्याची पार्श्वभूमी विदर्भाची आहे. त्यासाठी ठराविक लहेजा व भाषेची गरज होती. टीममधूनच हे गाणे कोणीतरी लिहावे, जेणेकरून जिव्हाळा व्यक्त होईल, अशी धारणा प्रत्येकाची होती. मी विदर्भाची असल्याने हे गाणे मला लिहिण्यास सांगितले गेले.

- डॉ. श्वेता पेंडसे, अभिनेत्री, गीतकार, पटकथाकार, संवादलेखिका

....................