शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नागपुरात काँग्रेसची उमेदवारी नाना पटोलेंना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 8:22 PM

भाजपाचे ‘हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरात काँग्रेस कुणाला रिंगणात उतरविते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांचे नाव हायकमांडने फायनल केले असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी दिल्लीत दिवसभर चाललेल्या घडामोडीनंतर छाननी समितीने पटोले यांच्या नावावर शिकामोर्तब केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. मात्र, काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याकडून यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

ठळक मुद्देछाननी समितीत शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा : अधिकृत घोषणा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे ‘हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरात काँग्रेस कुणाला रिंगणात उतरविते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांचे नाव हायकमांडने फायनल केले असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी दिल्लीत दिवसभर चाललेल्या घडामोडीनंतर छाननी समितीने पटोले यांच्या नावावर शिकामोर्तब केल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला. मात्र, काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याकडून यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.२०१४ च्या निवडणुकीत गडकरी यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांचा तब्बल २ लाख ८५ हजार मतांनी पराभव केला. मुत्तेमवार यापूर्वी नागपुरातून चार वेळा विजयी झाले होते. मात्र, गेल्यावेळच्या पराभवानंतर पक्षाने नवा चेहरा द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून पुढे आली होती. शेवटी मुत्तेमवार यांनी एक पाऊल मागे सरत पटोले यांचे नाव समोर केले होते. असे असले तरी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे व ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचेही नाव अखेरपर्यंत दिल्लीत चर्चेत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुत्तेमवार गटाने पटोले किंवा ठाकरे अशी भूमिका घेतली होती तर अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव अविनाश पांडे व अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी गुडधे यांच्या नावाला पसंती दिली. दरम्यान, पटोले यांनी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष खा. राहुल गांधी व महाराष्ट्र प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेत नागपुरातून लढण्याची तयारी दर्शविली. यानंतर झालेल्या पक्षाच्या छाननी समितीच्या बैठकीत पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा पटोले समर्थकांनी केला आहे. काँग्रेसमध्ये अधिकृत घोषणा होईपर्यंत काहीच खरे नसते याची जाणीव असल्यामुळे पटोले यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. आपण छाननी समितीला आपला होकार कळविला आहे, प्रदेश प्रभारी खरगे यांच्याशी बोलणे झाले आहे, पक्षाने आदेश दिला तर लढण्यास सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले.पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर उघड टीका करीत भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे त्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा- गोंदिया लोकसभेची जागाही भाजपाला गमवावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयी झाले होते. तेव्हापासून पटोले हे सातत्याने भाजपा नेत्यांना लक्ष्य करीत नागपुरातून लढण्यास सज्ज असल्याचे सांगत होते.हायकमांडने शोधला गटबाजीवर उपायनागपुरातील काँग्रेसच्या गटबाजीमुळे हायकमांडही त्रस्त आहे. गेल्या महिन्यात मुत्तेमवार व सतीश चतुर्वेदी या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची शिष्टमंडळे दिल्लीत धडकली होती. एका गटाला उमेदवारी दिली तर दुसऱ्या गटाकडून विरोध होण्याची शक्यता पाहता हायकमांडने पटोले यांच्या रुपात तिसरा उमेदवाराचा पर्याय काढला, अशी चर्चा आहे. मात्र, पटोले यांनी सुरुवातीलाच मुत्तेमवारांचा हात धरल्यामुळे चतुर्वेदी-राऊत-अहमद गट काय भूमिका घेतो, याकडे काँग्रेसजनांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Nana Patoleनाना पटोले