शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

नागपूर-नांदेड विमानसेवा लवकरच सुरू होणार

By मोरेश्वर मानापुरे | Published: April 02, 2024 10:08 PM

विमानाच्या उड्डाणासाठी स्टार एअरला मिळाली विमानतळाची वेळ

नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरूननागपूर-नांदेड विमानसेवा १ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र स्टार एअरने ती तूर्तास पुढे ढकलली असून आता लवकरच सुरू होणार आहे. कंपनीने विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव नागपूर विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडला (एमआयएल) दिला होता. एमआयएलने तो प्रस्ताव दिल्लीतील स्लॉट समन्वय समितीसमोर ठेवला. त्यावर निर्णय होऊन कंपनीला विमानाच्या उड्डाणासाठी वेळ मिळाली आहे.

दोन वर्षांपूर्वी एप्रिलमध्येच उपराजधानीतून पहिले आरसीएस विमान नागपूर ते बेळगाव सुरू झाले. यावर्षी एप्रिलमध्येच नागपूर ते नांदेड विमान सुरू होण्याची शक्यता होती आणि स्टार एअरने एप्रिल-२०२३ पासून नागपूर ते बेळगावसाठी आठवड्यातून दोन दिवस (शनिवार आणि मंगळवार) उड्डाणे सुरू केली होती. एक वर्षानंतर किसनगडपर्यंत मार्ग जोडण्यात आला. नागपूर ते किशनगड आणि बेळगावपर्यंतची उड्डाणे आठवड्यातून चार दिवस उपलब्ध झाली आहेत.

स्टार एअर सध्या बेंगळुरू, हैदराबाद आणि हिंडन (उत्तर प्रदेश) येथून नांदेडसाठी उड्डाणे चालवते. या तीनपैकी कोणताही एक मार्ग नागपूरशी जोडून विमान कंपनी नांदेडला विमानसेवा सुरू करू शकते. कंपनीचकडे एम्बरर-१४५ ही विमाने आहेत. या विमानाची प्रवासी क्षमता ७६ आसनी असून सर्व आरसीएस आहेत. त्यामुळे त्याचे भाडे ३ ते ५ हजारादरम्यान आहेत. नागपूर ते नांदेड विमानसेवा सुरू झाल्यास मराठवाड्यातून बिदरपर्यंतची ही पहिली विमानसेवा असेल.

कंपनीच्या ताफ्यात नऊ विमानेकंपनी अहमदाबाद, सुरत, कलबुर्गी, जोधपूर, जामनगर, तिरुपती, भूज, मुंबई, कोल्हापूर, जयपूर, हैदराबाद, पुणे, शिवमोग्गा, गोवा, लखनौ, आदमपूर यासह २२ शहरांसाठी उड्डाणांचे संचालन करते. या सेवेसाठी एकूण ९ विमाने आहेत. कंपनी आणखी दोन ते तीन विमानांचा ताफ्यात समावेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागपूर-नांदेड विमानसेवा सुरू होऊ शकते.

टॅग्स :nagpurनागपूरNandedनांदेडAirportविमानतळ