लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंबेडकरी चळवळीचा गड समजल्या जाणाऱ्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ हा रिपाइंच्या हातून निसटून काँग्रेसकडे गेला, आणि मागच्या निवडणुकीत भाजपने तो काँग्रेसकडून हिसकावून घेतला. यंदा निकालाच्या प्रारंभिक कलावरून हा गड परत काँग्रेसकडे जाण्याची चिन्हे दिसत असून नितीन राऊत यांनी आघाडी घेतली आहे.विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली या मतदारसंघात पाचव्या फेऱ्यांनंतर डॉ. नितीन राऊत यांनी आघाडी घेतली आहे. राऊत यांनी सातव्या फेरीत १०२९८ मतांची आघाडी घेतली आहे. राऊत यांना ३४५३५ तर देशमुख यांना २३६१७ मते मिळाली. उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३,८४, ५९४ मतदार आणि १४ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ५०.७६ टक्के मतदान झालंय.२०१४ च्या निवडणुकीत डॉ. मिलिंद माने यांना ६८९०५ आणि त्यांच्या निकटचे प्रतिस्पर्धी बसपाचे किशोर गजभिये यांना ५५१८७ मते मिळून त्यांचा पराभव झाला होता.
नागपूर उत्तर निवडणूक निकाल: मिलिंद माने माघारले, नितीन राऊत पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:49 AM