लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमन्यातील कुख्यात गुन्हेगार नॉडी ऊर्फ फैजान परवेज मन्सुरी (वय १९) याला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ८ च्या सुमारास पिस्तुलासह जेरबंद केले.
कुख्यात नॉडी शांतिनगरातील रामसुमेरबाबा नगरात पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी ४ वाजतापासून आरोपीची शोधाशोध करून एका पुलाखाली नॉडीला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल, मॅगझीन आणि जिवंत काडतूस आढळले. त्याच्याविरुद्ध शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार शांतिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त लोहित मतानी, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनगरचे ठाणेदार के. बी. उईके, उपिनरीक्षक एस. एस. बनसोड, हवालदार गणेश घुगुलकर, नायक अश्विन बोरकर, दत्ता घुगल, वसीम आणि विवेक कावडकर यांनी केली.