शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नागपुरात ३२ दिवसांनी रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:08 AM

नागपूर : कोरोनाचा वेग मंदावत असल्याचे दिलासादायक चित्र नागपूर जिल्ह्यात निर्माण झाले आहे. मागील महिन्यात ७,९९९वर पोहचलेली दैनंदिन रुग्णसंख्या ...

नागपूर : कोरोनाचा वेग मंदावत असल्याचे दिलासादायक चित्र नागपूर जिल्ह्यात निर्माण झाले आहे. मागील महिन्यात ७,९९९वर पोहचलेली दैनंदिन रुग्णसंख्या शनिवारी ३,८२७ नोंदविण्यात आली. ३२ दिवसांनंतर पहिल्यांदाच एवढे कमी रुग्ण आढळून आले. मात्र, मृत्यूची संख्या अद्यापही कायम आहे. पुन्हा ८१ रुग्णांचे मृत्यू झाले. विशेष म्हणजे, दिवसभरात ७,७९९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. कोरोनामुक्त होण्याचा दर वाढून ८५.१३ टक्क्यांवर पोहचला आहे.

नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात रुग्ण व मृत्यूच्या संख्येचे जुने विक्रम मोडित निघाले. २४ एप्रिल रोजी ७,९९९ रुग्णांची नोंद होऊन रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला. त्यानंतर सहा ते सात हजार दरम्यान रुग्णसंख्या स्थिरावली. ३ मेपासून दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजाराखाली आली. सर्वाधिक कमी रुग्णसंख्येची नोद ६ एप्रिल रोजी झाली होती. ३,७५८ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत घसरण झाल्याचे दिसून आले. शनिवारी २०,२३५ चाचण्या झाल्या. यात १७,१०७ आरटीपीसीआर तर ३,१२८ रॅपिड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर १८.१९ टक्के होता.

-शहरात २०१६ तर, ग्रामीणमध्ये १७९७ रुग्ण

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २०१६ तर ग्रामीणमधील १७९७ रुग्णांचा समावेश होता. मृतांमध्ये शहरातील ५१ तर ग्रामीणमधील १६ मृत्यू होते. शहरात आज १४,७५६ तर ग्रामीणमध्ये ५४७९ चाचण्या झाल्या. शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील पॉझिटिव्हिटीचा दर मोठा असल्याने या भागात चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

-आठवड्याभरात ३१,६०८ रुग्ण तर, ५८२ मृत्यू

मागील दोन आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्ण व मृत्युसंख्येत मोठी घट आल्याचे दिसून येत आहे. १८ ते २४ एप्रिल दरम्यान रुग्णांची संख्या ५८,१८९ तर मृतांची संख्या ७४८ होती. २५ एप्रिल ते १ मे या आठवड्यात ४७,९४६ रुग्ण व ६५१ मृत्यू नोंदविण्यात आले होते. २ ते ८ मे या आठवड्यात ३१,६०८ रुग्ण व ५८२ मृत्यूची नोंद झाली आहे.

:: आठवड्याची स्थिती

१८ ते २४एप्रिल : ५८,१८९ रुग्ण : ७४८ मृत्यू

२५ एप्रिल ते १ मे : ४७,९४६ रुग्ण : ६५१ मृत्यू

२ ते ८ मे : ३१,६०८ रुग्ण : ५८२ मृत्यू

.::कोरोनाची गुरुवारची स्थिती

दैनिक चाचण्या: २०,२३५

एकूण बाधित रुग्ण :४,४५,९७१

सक्रिय रुग्ण : ५८,२४५

बरे झालेले रुग्ण :३,७९,६५७

एकूण मृत्यू : ८,०६९