Nagpur : 'तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी असल्याशिवाय अधिकारी सुधारणार नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:15 PM2021-04-28T12:15:24+5:302021-04-28T12:18:29+5:30

Nagpur : कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे धिंदोडे निघत असून काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला

Nagpur : 'Officers will not improve unless they have good officers like Tukaram Munde', nagpur congressman in MNC | Nagpur : 'तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी असल्याशिवाय अधिकारी सुधारणार नाहीत'

Nagpur : 'तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी असल्याशिवाय अधिकारी सुधारणार नाहीत'

googlenewsNext

नागपूर - कोरोना महामारीच्या पहिल्या स्ट्रेनमध्ये सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हेनागपूरचे आयुक्त होते. या काळात त्यांनी केलेल्या कामामुळे कोरोनाला आळा घालण्यात नागपूरकरांनी मोठे यश मिळवले होते. केविड सेंटरला भेट देणे असो किंवा रस्त्यावर उतरुन कामाची पाहणी करणे असो, कारवाईसाठीही ते मागेपुढे पाहात नव्हते. मात्र, नागपूरहून तुकाराम मुंढेंची बदली झाली अन् कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूरकरांना तुकाराम मुंढेंची आठवण झाली. 

कोरोनाच्या प्रकोपामुळे नागपूरमध्ये आरोग्यव्यवस्थेचे धिंदोडे निघत असून काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. यावेळी, तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी मागणीही त्यांनी केली. तुकाराम मुंढे यांच्यासारखे खमके अधिकारी असल्याशिवाय सरकारी अधिकारी सुधारणार नाहीत, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या या गोंधळाची आणि मागणीची नागपूरसह सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलीय.  

बंटी शेळके यांनी विभागीय आयुक्त घातलेल्या या गोंधळाचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर आरडाओरडा करत ‘यांना जाळून टाकू’, अशी धमकीही दिली. यावेळी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार अभिजित वंजारीही उपस्थित होते. या सगळ्यांदेखत बंटी शेळके यांनी नाशिकमधील सरकारी अधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले.

मुंडेंची मुंबईत बदली

नागपूर महापालिका आयुक्तपदी असलेल्या तुकाराम मुंडे यांची मुंबईत बदली करण्यात आली. तुकाराम मुंढे यांची 2020 च्या जानेवारी महिन्यात नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता अवघ्या सात महिन्यातच त्यांची पुन्हा एकदा मुंबईत बदली करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या जागी नागपूरच्या आयुक्तपदी राधाकृष्णन बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नगरसेवकांशी झाला होता वाद

आतापर्यंत तुकाराम मुंढे यांची अनेकदा बदली करण्यात आली आहे. आपल्या धडाडीच्या निर्णयाने ते नेहमीच चर्चेत देखील असतात. तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक शिस्तीबद्दल ओळखले जातात. यामुळेच त्यांची अनेकदा बदलीही झाली. या वर्षी जानेवारीमध्ये ते नागपूर महानगरपालिका आयुक्तपदी विराजमान झाले होते. २००५ च्या बॅचचे ते आयएएस ऑफिसर आहेत. त्यांच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळे अनेकदा त्यांचे नगरसेवक असो वा इतर राजकीय अधिकाऱ्यांशी वाद झाले आहेत. नाशिक महापालिकेत आयुक्त असताना मुंढे यांचा नगरसेवकाशी वाद झाला होता. तर नवी मुंबई महापालिकेत नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव देखील आणला होता. 

Web Title: Nagpur : 'Officers will not improve unless they have good officers like Tukaram Munde', nagpur congressman in MNC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.