लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओला कंपनीकडून वाहनचालकांसोबत मनमानी व्यवहार केला जात आहे. वाहनचालकांच्या बाबतीत भेदाभेद केला जात आहे. ओला कंपनीकडून सुरू असलेल्या मनमानीच्या विरोधात वाहनचालकांनी वाहने बंद ठेवून संप पुकारला. कस्तुरचंद पार्क मैदानावर सर्व वाहनचालक जमा झाले होते.ओला लिजींग ड्रायव्हर्सचे म्हणणे होते की, कंपनी काहींचा बोनस ६ रुपये, काहींचा १० रुपये तर काहींना एक रुपयाही बोनस देत नाही. बोनस ही ड्रायव्हरची खरी कमी असून, कधीही बोनस कमी जास्त करते. एक रुपया मायनस आला तर गाडी बंद केल्या जाते. अपघात झाल्यानंतर २५०० रुपये ड्रायव्हरकडून वसूल केले जातात. गाडी देताना सहा रुपये बोनस देऊ असे सांगितले होते. काही दिवसांपासून बोनस बंद केला आहे. कमिशनही २० वरून ३० टक्के झाले आहे. वाहन चालकांची मागणी आहे की, सहा रुपये प्रमाणे बोनस द्यावा. बोनस नसेल तर ३० टक्के कमिशन घेऊ नये. वाहनचालकांनी वाहने बंद ठेवून आपल्या मागण्यांकडे कंपनीचे लक्ष वेधले आहे.
नागपुरात ओला वाहनचालकांनी पुकारला बेमुदत संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 9:46 PM