लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याचे कारण पुढे करीत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रचंड वाढ करायला सुरुवात केली आहे. मंगळवारी तर नागपुरात पेट्रोलचा दर एका लिटरला ८0 रुपये ७१ पैसे होता, तर डिझेलचा दर ६७ रुपये ८० पैसे होता. दोन्ही इंधने यापूर्वी कधीच इतकी महागली नव्हती.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर मागील महिन्यापेक्षा जवळपास ८ डॉलर प्रति बॅरेलने अर्थात ३.२२ रूपये प्रति लिटरने वधारले. पण पेट्रोलची किंमत साडे सहा रूपयांनी वाढली.कच्च्या तेलाचे दर डिसेंबरच्या तुलनेत वधारले असले तरी गेला आठवडाभर ते स्थिर आहेत. तरीही पेट्रोल व डिझेल रोज महागत आहे. त्यातही डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूक महाग होत आहे आणि दरवाढ अशीच होत राहिल्यास एसटीचे प्रवासी भाडेही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्यात पेट्रोलचे दरशहर दरमुंबई ८०.२५पुणे ७९.९५नागपूर ८०.७१औरंगाबाद ८१.२०कोल्हापूर ८०.४५सोलापूर ८०.८८