शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘प्रोफेसर गँग’ला नागपूर पोलिसांचा झटका, चौघांना अटक; गुंतवणूकदारांची रक्कम मिळाली परत

By योगेश पांडे | Updated: July 10, 2024 23:41 IST

शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आरोपींनी तब्बल १.१५ कोटी केले होते लंपास

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली विविध नावांनी गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढून सायबर ठगांच्या ‘प्रोफेसर गॅंग’ला नागपूर पोलिसांनी चांगलाच झटका दिला आहे. दोन प्रकरणांच्या तपासादरम्यान पोलिसांनी चार आरोपींना अटक करत गुंतवणूकदारांना १.१५ कोटींची रक्कम परत मिळवून दिली. ‘मनी ट्रेल’च्या माध्यमातून आरोपींपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून पैसे मिळवू शकल्या जातात यावर ‘लोकमत’ने ‘ट्रेडिंगचा भुलभुलय्या’ या वृत्तमालिकेतून प्रकाश टाकला होता व या कारवाईने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मोती किशनचंद दुलारामानी (७८, कॅनल रोड, रामदासपेठ) यांची सायबर ठगांनी २.४८ कोटींनी फसवणूक केली होती. त्यांना आरोपींनी ‘झार स्टॉक फ्रंटलाईन ६८’ या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर जास्त नफ्याचे आमिष दाखवत त्यांना ‘सीएचसी-एचईएस’ या ॲपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूक करायला लावली. यात दुलारामानी यांनी २.४८ कोटी रुपये गमावले. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता व तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी तातडीने पावले उचलत मनी ट्रेलच्या माध्यमातून आरोपींच्या खात्यातून रक्कम कुठे कुठे गेली याची माहिती घेतली. त्यानंतर संबंधित बॅंकांना पत्रव्यवहार करून बॅंक खाते गोठविण्यात आले.

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून दुलारामानी यांना १.०७ कोटी रुपये परत मिळवून देण्यात यश आले. उर्वरित रक्कमदेखील लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तपासादरम्यान पोलीस मनोज प्रतापचंद बंसल (५०, आग्रा, उत्तरप्रदेश), राजेशकुमार सियाराम गोयल (५७, गाजीयाबाद, उत्तरप्रदेश), तुषार संजयकुमार गर्ग (३०, नवी दिल्ली), विकास किसनकुमार बंसल (५२, नवी दिल्ली) यांच्यापर्यंत पोहोचले व त्यांना अटक केली. या आरोपींविरोधात नवी दिल्लीतदेखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणात ते अगोदरच अटकेत आहेत. त्यांचा ताबा लवकरच घेण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक अमित डोळस, संदीप बागुल, दत्तात्रय निनावे, गजानन मोरे, अजर पवार, योगेश काकड, रोहीत मटाले, सुशील चनगोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

८.३८ लाख देखील मिळाले परत

दुसऱ्या एका प्रकरणात आरोपींनी महेश राजेश्वर मानकर यांना ८.३८ लाखांनी गंडा घातला होता. आरोपींनी त्यांना डोलो हे ॲप डाऊनलोड करून गुंतवणूक करण्यास सांगितले होते. त्यांना सुरुवातीला नफा मिळाला. मात्र पैसे निघतच नव्हते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. पोलिसांनी आरोपींच्या बॅंक खात्यांना गोठविले व त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना पूर्ण रक्कम परत मिळवून दिली.

टॅग्स :nagpurनागपूरcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी