लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवघ्या तीन दिवसात पासपोर्ट संबंधाची संपूर्ण प्रक्रीया पूर्ण करून नागपूर पोलिसांनी पासपोर्ट तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सेवेत महाराष्टात अव्वलस्थान मिळवले आहे.अर्जदारांना पासपोेर्ट तात्काळ उपलब्ध व्हावा म्हणून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून एम पासपोर्ट पोलीस अॅप हे एक मोबाईल अप्लीकेशन (अॅप) २०१७ मध्ये कार्यान्वित केले होते. या अॅपद्वारे केंद्रीय पारपत्र कार्यालय / पासपोर्ट सेवा केंद्र नागपूर येथे अर्जदाराने नोंद केल्यानंतर व्हेरिफिकेशनसह पुढची सर्व प्रक्रिया आॅनलाईन राबवून चौकशी अहवाल विहीत मुदतीत विभागीय पारपत्र कार्यालयात पाठविण्यात येतो. सध्यस्थितीत पोलीस आयुक्तालयात एम पासपोर्ट पोलीस अॅपचे काम १०० टक्के पेपरलेस करण्यात आले आहे. विदेशी मंत्रालयातर्फे २१ आॅगस्ट २०१७ ला नागपुरात पोलीस व्हेरिफिकेशन कार्यपध्दती संबधाने एक बैठक पार पडली. या बैठकीत १८ राज्यातील पासपोर्ट विभागाचे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पासपोर्ट चौकशीचा सरासरी कालावधी तेलांगणात ६ दिवस, आंध्रप्रदेश ९ दिवस, गुजरात ११ तर महाराष्ट्र ३९ दिवस असा होता. त्या मध्ये नागपूर शहराची नोंद २८ दिवसांची होती. मात्र, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी कमीत कमी दिवसात ही प्रक्रीया पूर्ण करण्याचे आव्हान स्विकारले. त्यानंतर त्यांनी पोलीस उपायुक्त विशेष शाखा यांनी आपल्या सहका-यांच्या माध्यमातून जानेवारी २०१८ मध्ये हा कालावधी ६ दिवसांवर आणला. जो महाराष्टात नागपूर पोलिसांनी अव्वलस्थानी पोहचवणारा ठरला.२७ मे २०१८ पासून परराष्ट्र मंत्रालयाने एम पासपोर्ट पोलीस मोबाईल अॅप्लीकेशन (अॅप) नवीन (अद्ययावत) स्वरूपात आणला आहे. त्यानुसार, आधीच्या तुलनेत चौकशीचे मुद्देही कमी करण्यात आले आहे. परिणामी नागपूर पोलिसांनी हा कालावधी आता २ ते ३ दिवसांवर आणून महाराष्ट्रात नागपूर पोलिसांची कार्यपद्धती पहिल्या क्रमांकावर आणल्याचा दावा पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आला आहे.
पासपोर्ट व्हेरिफिकेशन प्रक्रियेत नागपूर पोलीस अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:59 AM
अवघ्या तीन दिवसात पासपोर्ट संबंधाची संपूर्ण प्रक्रीया पूर्ण करून नागपूर पोलिसांनी पासपोर्ट तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सेवेत महाराष्टात अव्वलस्थान मिळवले आहे.
ठळक मुद्देअवघ्या तीन दिवसात चौकशी : अद्ययावत अॅपचा वापर