शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

नागपूरच्या पोलीस व्हॅनला अपघात; ६ जखमी

By admin | Published: August 26, 2015 12:42 AM

अकोला जिल्ह्यातील वाशिंबा येथे घडला अपघात; सहा पोलीस कर्मचारी जखमी.

बोरगाव मंजू (जि. अकोला) : टँकर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पोलीस व्हॅन टँकवर आदळून, सहा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील वाशिंबा येथे मंगळवारी घडली. एमएच-३१-डी-४७१९ क्रमाकांची राज्य राखीव पोलीस दलाची व्हॅन नागपूर येथून नाशिककडे जात होती. व्हॅनमध्ये २७ पोलीस कर्मचारी होते. अकोलानजिक असलेल्या वाशिंबा येथे एमएचएफपी-५१६१ क्रमांकाच्या गॅस वाहून नेणार्‍या टॅँकरच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पोलीस व्हॅन टँकरवर आदळली. या अपघातात किरण कडाक, महेंद्र ठोंबरे, जीवन मेश्राम, के.बी. गजभिये, डी.पी. कोवासे, मंगेश देवघडे हे जखमी झाले. जखमींना सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले असून, याप्रकरणी गॅस टँकरच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.