लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे नागरिक आपल्या घरात बंदिस्त आहेत. यात कडक उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. अशा स्थितीत पाच तास वीज गुल झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. ही घटना एखाद्या खेडेगावात नव्हे तर नागपुरात घडली. सकाळी ७ वाजता दाभा परिसरातील वीज गेली. पाच तासानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. या काळात गरमीमुळे नागरिकांचे मोठे हाल झाले.एखाद्या वेळी हवा सुटल्यास किंवा पाऊस आल्यास वीज जाते. परंतु बुधवार असल्यामुळे देखभालीच्या नावाखाली पाच तास दाभा परिसरातील वीज बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी महावितरणच्या अॅपवर संपर्क साधला. परंतु त्यांना त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आल्याची चुकीची माहिती मिळाली. लॉकडाऊनच्या काळात वीज बिलाच्या पेमेंटबाबत तक्रार करण्यासाठी अॅपचा वापर करण्याचे आवाहन महावितरण करीत आहे. परंतु या अॅपवरच नागरिकांना चुकीची माहिती मिळत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. देखभालीच्या नावाखाली पाच तास वीज पुरवठा खंडित केल्याबद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.
नागपुरात पाच तास वीज गुल झाल्यामुळे झाले नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 8:18 PM
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनमुळे नागरिक आपल्या घरात बंदिस्त आहेत. यात कडक उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत आहे. अशा ...
ठळक मुद्देमहावितरणच्या अॅपवर चुकीची माहिती