शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

नागपुरात मालमत्ता टॅक्सची थकबाकी १६५ कोटींनी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 7:14 PM

नागपूर शहरात ७ लाख ३१ हजार ४२१ मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून २०२०-२१ या वर्षात थकबाकीसह येणे वसुली ६७९.०४ कोटींची आहे. २०१९-२० या वर्षात ६ लाख ८४ हजार ७५० मालमत्ताधारकांकडून थकबाकीसह ५१४.७५ कोटींचा टॅक्स वसूल करावयाचा होता. परंतु गेल्या आर्थिक वर्षात टॅक्सच्या माध्यमातून २४५ कोटींची वसुली झाली. थकबाकी वसूल होत नसल्याने व गेल्या वर्षाच्या तुलनेत टॅक्सच्या थकीत रकमेत १६५ कोटींची वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात ७ लाख ३१ हजार ४२१ मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून २०२०-२१ या वर्षात थकबाकीसह येणे वसुली ६७९.०४ कोटींची आहे. २०१९-२० या वर्षात ६ लाख ८४ हजार ७५० मालमत्ताधारकांकडून थकबाकीसह ५१४.७५ कोटींचा टॅक्स वसूल करावयाचा होता. परंतु गेल्या आर्थिक वर्षात टॅक्सच्या माध्यमातून २४५ कोटींची वसुली झाली. थकबाकी वसूल होत नसल्याने व गेल्या वर्षाच्या तुलनेत टॅक्सच्या थकीत रकमेत १६५ कोटींची वाढ झाली आहे.गेल्या वर्षात २ लाख ७५ हजार ४८० मालमत्ताधारकांनी टॅक्स भरला. तर ४ लाख ९ हजार मालमत्ताधारकांनी टॅक्स भरलेला नाही. त्यामुळे या थकबाकीदारांसह वित्त वर्षातील टॅक्स गृहीत धरता ६७९.०४ कोटींची वसुली मालमत्ता विभागाला करावयाची आहे. टॅक्स थकबाकीदारांची वाढती संख्या हा मालमत्ता विभागासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. २०१९-२० या वर्षात ५१४.७५ कोटी तर २०१८-१९ या वर्षात ३२३.३६ कोटीची वसुली करावयाची होती. मागील दोन वर्षात टॅक्स वसुली व उद्दिष्ट यात मोठी तफावत असल्याने थकबाकीचा आकडा दरवर्षी वाढत आहे. विशेष म्हणजे मोठे थकबाकीदार व शासकीय कार्यालये यांच्याकडे जवळपास २५० कोटींची थकबाकी आहे.लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक टॅक्स येणे आहे. झोनमधील ४३,४१५ मालमत्ताधारकांकडून १२५.७२ कोटी येणे आहे. त्याखालोखाल नेहरूनगर झोनमधील ६०,६५९ मालमत्ताधारकांकडून १२०.०३ कोटी येणे आहे.आक्षेप व तक्रारींचा वसुलीला फटकाशहरातील मालमत्तांचा सर्व्हे करताना मालमत्ताधारकांना विचारणा करण्यात आलेली नाही. नकळत हा सर्व्हे करण्यात आला. यावर आक्षेप वा तक्रारी करण्याची संधी न देता मालमत्ताधारकांना डिमांड पाठविण्यात आल्या. वाढीव डिमांडवर मालमत्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदविले. याचा परिणाम टॅक्स वसुलीवर झाला.झोन स्तरावर अंमलबजावणी नाहीमहापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता टॅक्स वसुलीच्या माध्यमातून वसुली झाल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. परंतु सध्याची लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेता पुढील काही महिने लोकांच्या हाती पैसा येण्याची शक्यता नाही. त्यातच मुख्यालयाने दिलेल्या निर्देशांची झोन स्तरावर अंमलबजावणी होत नसल्याने उद्दिष्ट गाठणे अवघड आहे.झोननिहाय मालमत्ता व येणे रक्कम (कोटीत)लक्ष्मीनगर -४३,४१५    १२५.७२धरमपेठ २१,६४४          ४०.१२हनुमाननगर-५०९०७    ७२.४९धंतोली ८९८६  २           ९.१४नेहरुनगर ६०६५९         १२०.०३गांधीबाग १५९४०         १४.००सतरंजीपुरा २७४४३     २६.३४लकडगंज ५६६०१         ७३.०७आसीनगर ९७१५३      १०२.४०मंगळवारी ५३९३३      ७५.६५

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर