लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात बुकी पंकज कडी याच्या बीअरबारच्या बाजूच्या शेडमध्ये चालविला जाणाऱ्या आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पाचपावली पोलिसांनी बुधवारी रात्री छापा मारला. पंकज कडीच्या सहा साथीदारांना (बुकींना) पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून मोबाईल टीव्हीसह १ लाख, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.वैशालीनगर, पाचपावलीतील सिल्व्हर बारमध्ये कुख्यात बुकी कपिल मोटवानी (रा. टेका नाका), अश्विन जयस्वाल (रा. कमाल चौक) तसेच त्यांचे साथीदार निखिल डोंगरे (रा. जरीपटका), राजकुमार नगराळे (रा. बाळाभाऊ पेठ), सुरेंद्र डोईफोडे (रा. बाळाभाऊ पेठ) आणि दिलीप खोब्रागडे (रा. बाळाभाऊ पेठ) हे सर्वजण आयपीएल सामन्यावर खायवाडी करीत असल्याची माहिती पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांना बुधवारी रात्री मिळाली. त्यावरून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सिल्व्हर बारमध्ये छापा घातला. बारच्या बाजूला एका शेडवजा रूममध्ये उपरोक्त आरोपी मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर खायवाडी करीत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात मोबाईल, एलसीडी तसेच अन्य साहित्यासह १ लाख, ६५ हजार, ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त राहुल माकणिकर, सहायक आयुक्त वालचंद्र मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक सुरोसे, पोलीस उपनिरीक्षक पी. आर. इंगळे, संजय वानखडे, अविराज भागवत,सचिन भिमटे,विनोद गायकवाड, प्रवीण वाकोडे यांनी ही कामगिरी बजावली.पंकज कडी फरारकुख्यात बुकी पंकज कडी हा सट्टा अड्डा चालवित होता. त्याचे गोवा आणि बँकांकमधील बुकींसोबत थेट संबंध आहे. पोलिसांची कारवाई होण्याच्या धाकामुळे तो स्वत: अड्ड्यावर बसत नाही. बुधवारीही त्याने आपले साथीदार तेथे बसवले आणि दुरून तो मोबाईलवरून त्यांना संचलित करीत होता. पोलिसांनी या प्रकरणात पंकज कडीलाही आरोपी केले असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात पंकज कडीच्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:29 AM
कुख्यात बुकी पंकज कडी याच्या बीअरबारच्या बाजूच्या शेडमध्ये चालविला जाणाऱ्या आयपीएल क्रिकेट सट्टा अड्ड्यावर पाचपावली पोलिसांनी बुधवारी रात्री छापा मारला. पंकज कडीच्या सहा साथीदारांना (बुकींना) पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून मोबाईल टीव्हीसह १ लाख, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ठळक मुद्देसहा बुकी जेरबंद : पावणदोन लाखांचा मुद्देमाल जप्त