लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: दानापूर-सिकंदराबाद (गाडी क्र. १२७९२) एक्सप्रेसमधून बालमजुरीसाठी नेल्या जात असलेल्या २६ अल्पवयीन मुलांना नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले व त्यांना नेणाऱ्यांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी दुपारी २.५५ च्या सुमारास करण्यात आली.ही गाडी दुपारी दोन क्रमांकाच्या फलाटावर लागल्यानंतर एस ८,९, १० व ११ व जनरल कोच या बोगींमधून १२ ते १८ या वयोगटातील एकूण २६ मुले नेत असल्याची बातमी रेल्वे पोलिसांना लागली. या मुलांना सिकंदराबाद येथे इमारतीच्या बांधकामासाठी नेण्यात येत होते. ही मुले बिहार व मध्यप्रदेशातल्या विविध ठिकाणांहून आली होती. याची बातमी कळताच आरपीएफची दोन माणसे नरखेडहून या गाडीत शिरली. त्यांनी या मुलांना व त्यांना नेणाऱ्यांना हेरून ठेवले व तशी सूचना नागपूर रेल्वे पोलिसांना दिली.ही गाडी स्टेशनमध्ये शिरण्याआधीच फलाट क्र. २ वर आरपीएफ व अन्य अधिकाऱ्यांची चमू हजर होती. त्यांनी तात्काळ या मुलांना व त्यांना नेणाºयांना ताब्यात घेतले. अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाडीसोबत आरपीएफचे दोन जवान गाडीसोबत पुढे रवाना झाले.
नागपूर रेल्वस्थानकावर २६ अल्पवयीन मुलांना रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 5:56 PM
दानापूर-सिकंदराबाद (गाडी क्र. १२७९२) एक्सप्रेसमधून बालमजुरीसाठी नेल्या जात असलेल्या २६ अल्पवयीन मुलांना नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले व त्यांना नेणाऱ्यांना अटक केली.
ठळक मुद्देबाल तस्करीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता