लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह देशभरात मोठ्या आणि लहान रेल्वेस्थानक परिसरात प्लास्टिक आणि पॉलिथीन बॅगचा वापर करण्यावर बंदी घालण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. २ ऑक्टोबरपर्यंत रेल्वेस्थानक परिसरातून प्लास्टिक हद्दपार करण्याच्या रेल्वे बोर्डाच्या सूचना आहेत. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना प्लास्टिकचा वापर न करण्याची शपथ देण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर रेल्वेस्थानक प्लास्टिकमुक्त होणार आहे.रेल्वेत एकदा वापर करून फेकण्याच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. यात रेल्वेतील सर्व व्हेंडरला प्लास्टिकच्या कॅरिबॅगचा वापर बंद करण्याबाबत जागरूकता करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी पुन्हा वापरात येणाºया पर्यावरणपूरक बॅगचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर याबाबत जागरूकता अभियान सुरू करण्यात आले नाही. परंतु प्लास्टिक बॉटल क्रश मशीन रेल्वेस्थानकावर यापूर्वीच लावण्यात आली आहे. आता अशाप्रकारच्या मशीन्स सर्वच रेल्वे स्थानकावर लावण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ विक्रेत्या स्टॉल्सधारकांनाही प्लास्टिकऐवजी इतर पर्यायांचा वापर करण्यासाठी २ ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नागपूर रेल्वेस्थानक प्लास्टिकमुक्त होणार आहे.
नागपूर रेल्वेस्थानक होणार प्लास्टिकमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 12:36 AM
नागपूरसह देशभरात मोठ्या आणि लहान रेल्वेस्थानक परिसरात प्लास्टिक आणि पॉलिथीन बॅगचा वापर करण्यावर बंदी घालण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. २ ऑक्टोबरपर्यंत रेल्वेस्थानक परिसरातून प्लास्टिक हद्दपार करण्याच्या रेल्वे बोर्डाच्या सूचना आहेत.
ठळक मुद्देरेल्वे बोर्डाचे आदेश : २ ऑक्टोबरला देणार प्लास्टिकचा वापर न करण्याची शपथ