शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

नागपूर रेल्वे स्थानक : ओएचई तारेमुळे जळून तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 9:18 PM

रेल्वेच्या इंजिनला विद्युत पुरवठा करणाऱ्या ओएचई (ओव्हर हेड इक्विपमेंट) ताराने जळुन एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४.४० वाजता होम प्लॅटफार्मजवळील यार्डातील ४ आणि ५ क्रमांकाच्या लाईनमध्ये घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ठळक मुद्देपेट्रोलच्या वॅगनवर चढला : होम प्लॅटफार्म जवळ यार्डातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या इंजिनला विद्युत पुरवठा करणाऱ्या ओएचई (ओव्हर हेड इक्विपमेंट) ताराने जळुन एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४.४० वाजता होम प्लॅटफार्मजवळील यार्डातील ४ आणि ५ क्रमांकाच्या लाईनमध्ये घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.राहुल भीमसेन छनकवानी (२६) रा. सिंधी कॉलनी, दुर्ग असे मृत युवकाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल हा वडिलांसह कोरबा एक्स्प्रेसने नागपूर ते दुर्ग असा प्रवास करीत होता. मात्र, वडिलाची नजर चुकवून तो गाडीखाली उतरला. वडिलांना तो गाडीतच असल्याचे वाटले. त्यानंतर राहुल प्लॅटफार्म क्रमांक ८ कडे गेला. येथे यार्डमध्ये किलोमीटर क्रमांक ८३६/१९ च्या शेजारी रेल्वे रुळाची ४ आणि ५ क्रमांकाची लाईन आहे. ४ क्रमांकाच्या लाईनवर पेट्रोलच्या वॅगन उभ्या होत्या तर ५ क्रमांकाच्या लाईनवर कोळशाने भरलेली मालगाडी उभी होती. दरम्यान राहुल पेट्रोलच्या वॅगन क्रमांक डब्ल्यू. आर. ४००८९१६६५०१ वर वॅगनवर चढला. त्याच वेळी त्याला ओएचई तारेचा जोरदार धक्का बसला. ओएचई तारेमुळे त्याच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. त्यात तो डोक्याच्या भारावर पडल्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्त बाहेर येत होते. घटनेची माहिती मिळताच उपस्टेशन व्यवस्थापक मनीष गौर, राजू इंगळे, रोकडे, दत्ता गाडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी रेल्वे डॉक्टर आणि लोहमार्ग पोलिसांनाही पाचारण केले. रेल्वे डॉक्टरांनी घटनास्थळ गाठून राहुलला मृत घोषित केले. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल परमानंद वासनिक करीत आहेत.मोबाईलवरून पटली ओळखओएचई तारेला स्पर्श होऊन युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी, डॉक्टर आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत युवक कोण आहे याबाबत पोलिसांना काहीच माहीत नव्हते. पोलीस त्याची ओळख पटविण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या खिशात असलेल्या मोबाईलवर नातेवाईकांचा फोन आला. यावरून मृत राहुलची ओळख पटली. लोहमार्ग पोलिसांनी नातेवाईकांकडून राहुलचे वडील आणि बहिणीचा मोबाईल क्रमांक मिळविला. राहुलचे काका नागपुरात वेकोलीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी लगेच नागपूर रेल्वेस्थानक गाठले. राहुल वडिलांसोबत घरी का गेला नाही. याचे उत्तर पोलीस तपासानंतर मिळणार आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरDeathमृत्यूelectricityवीज