शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

हीच का नागपूर रेल्वेस्थानकाची ‘वर्ल्ड क्लास’कडे वाटचाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:54 AM

नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास बनविण्याची तयारी सुरू असताना रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मची अवस्था वाईट झाली आहे. प्लॅटफार्मवर खड्डे पडले असून टाईल्स तुटल्या असून प्रवासी अडखळून पडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देरेल्वेस्थानकात जागोजागी खड्डे, टाईल्सही फुटल्या‘जीएम’ दौऱ्यानंतर विकास कामे ठप्परॅम्पवरून घसरतात प्रवासी प्लॅटफार्म क्रमांक चार आणि पाचवर जाण्यासाठी फूट ओव्हरब्रीज १ आणि २ च्या दरम्यान ग्रेनाईटचा रॅम्प बनविण्यात आला आहे. हा रॅम्प गुळगुळीत असल्यामुळे अनेकदा प्रवासी त्यावरून घसरुन खाली पडतात. डी कॅबिनजवळ विनाकारण सिमेंटचे बॉक्स लावण्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास बनविण्याची तयारी सुरू असताना रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्मची अवस्था वाईट झाली आहे. प्लॅटफार्मवर खड्डे पडले असून टाईल्स तुटल्या असून प्रवासी अडखळून पडण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यानंतर रेल्वेस्थानकावरील विकास कामे ठप्प झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.नागपूर रेल्वेस्थानकावरील समस्यांची पाहणी केली असता प्लॅटफार्म क्रमांक दोन आणि तीनवर अनेक खड्डे पडलेले असून जागोजागी टाईल्स उखडल्याचे चित्र दृष्टीस पडले. अशा स्थितीत प्रवाशांना रेल्वेगाडीत बसण्याची कसरत करावी लागत आहे. अनेकदा खड्ड्यात अडखळल्यामुळे प्रवाशांना किरकोळ जखमा होतात. एवढेच नाही तर प्लॅटफार्म क्रमांक चार आणि पाचवर टाईल्स लावण्यात आली. परंतु त्याचे सिमेंटीकरण करण्यात आलेले नाही. वर्षभरापूर्वी प्लॅटफार्म क्रमांक एकवर लावण्यात आलेल्या ग्रेनाईटलाही २५ ठिकाणी तडा गेल्याचे चित्र आहे. प्रवाशांना रेल्वेगाडीपासून दूर ठेवण्यासाठी टाईल्सने बनविण्यात आलेली पिवळी लाईनही अनेक ठिकाणी उखडली आहे.

थातूरमातूर कामामुळे पडले गेटमध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याच्या वेळी उद्घाटन झालेल्या मूलताई रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वार हवेमुळे खाली पडले. पांढुर्णा रेल्वेस्थानकावरही प्लॅटफार्म क्रमांक २ वर शौचालयाचे काम आतापर्यंत सुरू आहे. मूलताईचे गेट पडल्याची तक्रार मिळताच रेल्वे प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराविरुद्ध चौकशी समिती गठित केली असून समितीच्या अहवालानंतर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर