शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
3
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
4
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
5
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
6
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
7
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
8
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
9
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
10
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
12
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
13
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
14
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
15
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
16
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
17
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
18
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
19
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
20
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान

नागपूर-रामटेकमध्ये अटीतटीचा सामना की एकतर्फी ठरणार विजेता ?

By योगेश पांडे | Published: June 03, 2024 7:09 PM

उद्या होणार फैसला : कोण होणार सिकंदर : गडकरी की ठाकरे, बर्वे की पारवे ?

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीचे बहुप्रतिक्षित निकाल मंगळवारी जाहीर होणार असून नागपूररामटेक लोकसभा मतदारसंघात मतदार राजाने नेमका कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. मागील सव्वा महिन्यापासून निकालांबाबत वेगवेगळे कयास लावले जात होते. आता कुणाचे दावे खरे ठरले व कुणाचे आकडे हवेत विरले यावरुन पडदा हटणार आहे. साधारणत: दुपारनंतर कल लक्षात येणार असला तरी निकालाचे अंतिम आकडे हाती यायला वेळ लागणार आहे.

विशेषत: नागपूर मतदारसंघाकडे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर दुसरीकडे कॉंग्रेसचे विकास ठाकरे अशी येथे लढत आहे. तर दुसरीकडे रामटेकमधून शिंदेसेनेचे राजू पारवे व कॉंग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यात थेट सामना आहे. वृत्तवाहिन्यांवरील ‘एक्झिट पोल्स’नंतर नागपूर-रामटेकचा गड महायुती राखणार की महाविकासआघाडी अनपेक्षित धक्का देणार याबाबतची उत्सुकता वाढली आहे.कळमना मार्केट यार्डमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल व साधारणत: दुपारपर्यंत कलाचे चित्र स्पष्ट होईल. निवडणूकांच्या तारखेची घोषणा होण्याअगोदरच नागपुरचे राजकीय वातावरण तापले होते. प्रचारादरम्यान विविध पक्षाच्या नेत्यांनीदेखील नागपुरात उपस्थिती लावून जाहीर सभांच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. दरम्यान, मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली असून पोलिसांचादेखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पंतप्रधानांपासून या नेत्यांच्या झाल्या सभारामटेक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तर नागपुरात कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सभा घेतली. याशिवाय उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती, खासदार मनोज तिवारी यांच्या सभांचेदेखील आयोजन करण्यात आले.

कोणता मतदारसंघ फिरवू शकतो निकाल ?नागपूर पूर्व व नागपूर उत्तर या मतदारसंघात ५५ टक्क्यांच्या वर मतदान झाले. नागपूर उत्तरमधून २०१९ मध्ये नितीन गडकरी पिछाडीवर होते. यावेळी महाविकासआघाडीने तेथे ताकद लावली होती. तर नागपूर पूर्वमधून गडकरींना विक्रमी मताधिक्य होते. यावेळी तेथून मागील वेळपेक्षा जास्त लीड मिळेल असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. नागपुरात हे दोन मतदारसंघ निकालात महत्त्वाचे ठरणार आहेत.

याअगोदरच्या निवडणूकीत असे होते चित्र२०१४ व २०१९ च्या निवडणूकीत नितीन गडकरी यांनी सलग दोनदा विजय मिळविला. २०१४ मध्ये गडकरी यांनी विलास मुत्तेमवार यांच्यावर २ लाख ८४ हजार ८४८ मतांनी तर २०१९ मध्ये पटोले यांना २ लाख १६ हजार ९ मतांनी पराभूत केले होते. तर रामटेक मतदारसंघात २०१४ मध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी कॉंग्रेसचे मुकुल वासनिक यांना १ लाख ७५ हजार १०१ मतांनी व २०१९ मध्ये कॉंग्रेसचेच किशोर गजभिये यांना १ लाख २६ हजार ७८३ मतांनी हरविले होते.

विधानसभा मतदारसंघनिहाय असे झाले होते मतदानमतदारसंघ :                   एकूण मतदार :                    मतदान :                    मतदानाची टक्केवारीनागपूर दक्षिण-पश्चिम :           ३,७६,४०८ :                   १,९९,२५८ :                         ५२.९४नागपूर दक्षिण :                     ३,७२,४९५ :                    २,००,९९८ :                         ५३.९६नागपूर पूर्व :                          ३,८७,७६२ :                   २,१६,२७४ :                         ५५.७८नागपूर मध्य :                         ३,१५,८४९ :                    १,७१,४४१ :                          ५४.२८नागपूर पश्चिम :                       ३,६५,३४३ :                   १,९६,२८७ :                          ५३.७३नागपूर उत्तर :                        ४,०५,४२४ :                    २,२३,४८० :                          ५५.१२

नागपूर लोकसभाएकूण उमेदवार : २६एकूण मतदार : २२,२३,२८१झालेले मतदान : १२,०७,७३८टक्केवारी : ५४,३२ %

रामटेक लोकसभाउमेदवार : २८मतदार : २०,४९,०८५झालेले मतदान : १२,५०,१९०टक्केवारी : ६१.०१ %

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nagpurनागपूरramtek-acरामटेकNitin Gadkariनितीन गडकरीVikas Thackreyविकास ठाकरे