लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या लीगची सुरुवात यावर्षी करण्यात आली आहे. पहिल्या दोन तिमाहीचे निकाल मंगळवारी दिल्ली येथे जाहीर करण्यात आले आहे. यात देशभरातील १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहराच्या यादीत पहिल्या क्रमांकावर इंदूर आहे तर नागपूर शहर एप्रिल ते जून २०१९ या तिमाहीत ३० व्या क्रमांकावर होते, मात्र जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत झेप घेत नागपूर शहराने १५ क्रमांक मिळविला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात देशभरातील शहरात अव्वल येण्याच्या दृष्टीने हे शुभ संकेत आहेत.दुसऱ्या तिमाहीत महाराष्ट्रातून नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर होते. नाशिक सातव्या, मुंबई आठव्या , पुणे १२ व्या, पिंपरी चिंचवड १४ व्या क्रमाकांवर आहे. देशभरातील चार हजारांहून अधिक शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. स्थानिक स्तरावर स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या आधारावर लीगचे गुणांकन केले जात आहे.केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्वच्छता सर्वेक्षण लीग २०२० च्या पहिल्या दोन तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या वर्षात सर्वेक्षणात ४२७३ शहरांनी सहभाग घेतला आहे. हा निकाल तिमाहीचा आहे. स्वच्छता सर्वेक्षण शिल्लक आहे. गेल्या तीन महिन्यात करण्यात आलेल्या स्वच्छता उपाययोजनांच्या आधारे रॅकिंग देण्यात आले आहे. नागपूर शहराच्या क्रमांकात सुधारणा झाल्याने प्रशासन सर्वेक्षणाच्या कामात पूर्ण शक्तिनिशी लागल्याचे स्पष्ट होत असल्याचे आयोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले. आयुक्त अभिजित बांगर व अपर आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात स्वच्छतेचे काम सुरू आहे. यात चांगली प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम फेरीत नागपूर अव्वल शहरांच्या यादीत येईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.गेल्या वर्षी स्वच्छतेत नागपूर ५८ व्या क्रमांकावर होते. यात सुधारणा करीत नागपूर शहराने दुसऱ्या तिमाहीत १५ वा क्रमांक मिळविला आहे. याचे श्रेय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना आहे. शहरातील नागरिकांनी सहकार्य केल्यास अंतिम फेरीत नागपूरचा समावेश अव्वल क्रमांकाच्या शहरात होईल.कौस्तुभ चॅटर्जी , ग्रीन व्हीजील
स्वच्छतेत नागपूर १५व्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:41 PM
स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या लीगची सुरुवात यावर्षी करण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत झेप घेत नागपूर शहराने १५ क्रमांक मिळविला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात देशभरातील शहरात अव्वल येण्याच्या दृष्टीने हे शुभ संकेत आहेत.
ठळक मुद्देलीग २०२० च्या तिमाहीचे निकाल जाहीर: अव्वल क्रमांकावर येण्याचे संकेत