लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात आज सकाळी पावसाचे आगमन झाले. वेधशाळेने केलेल्या नोंदीनुसार 3.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरात सकाळी जोरदार पाऊस झाला तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही तालुक्यात तुरळक पाऊस झाला. ग्रामीण माझ्यापेक्षा नागपूर शहरात अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. ढगाळी वातावरणामुळे आणि पावसामुळे शहरातील वातावरण बदलले असून तापमानही खालावले आहे. सकाळी आठ वाजताच्या नोंदीनुसार नागपुरात 36.8 तापमानाची नोंद झाली आहे.विदर्भातही वातावरण बदलले असून आकाश ढगाळलेले आहे. वेधशाळेने पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला असून 19 तारखेचा वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा दिला आहे.
नागपुरात 3.8 मिलिमीटर पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:52 AM