लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातून ए.जी. एनव्हायरो व बीव्हीजी या दोन कंपन्यांच्या माध्यमातून दररोज ११५० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. परंतु शहरात लॉकडाऊ न सुरू असल्याने प्रमुख बाजारांतील गर्दी कमी झाली आहे. रस्त्यावर वर्दळ नसल्याने शहरातील बाजार, रस्ते व चौकात स्वच्छता दिसत असून कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून आता दररोज ७०० मेट्रिक टन कचरा संकलित होत आहे. म्हणजेच ४५० मेट्रिक टन कचरा कमी निघत आहे.ए.जी. एनव्हायरो या कंपनीला पाच झोनमधील कचरा संकलनाची जबाबदारी दिली आहे. यात लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगरचा समावेश आहे. बीव्हीजी या कंपनीक डे गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर व मंगळवारी या पाच झोनची जबाबदारी दिली आहे. महापालिकेचे ६५०० सफाई कर्मचारी दररोज शहरातील रस्ते स्वच्छ करतात. तर दोन कंपन्यांकडील १८०० सफाई कर्मचारी घराघरातून कचरा संकलन करतात. म्हणजेच ८,३०० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दररोज ११५० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. मात्र मागील काही दिवसात कचरा संकलन कमी झाले आहे. सोमवार व मंगळवारी दोन दिवसात सुमारे १४०० मेट्रिक टक कचरा संकलित करण्यात आला.स्वच्छता कर्मचारी दररोज रस्ते व बाजारात सफाई करतात. परंतु वर्दळीमुळे काही तासातच पुन्हा कचरा होतो. तो दिवसभर तसाच पडून असतो. परंतु आता सकाळी स्वच्छ केलेले रस्ते दिवसभर स्वच्छ दिसत आहे. बाजारातही अशीच स्वच्छता दिसत आहे. लॉकडाऊ मुळे कचरा संकलन घटल्याने नागरिक रस्त्यांवर जवळपास ४०० ते ४५० मेट्रिक टन कचरा करतात.कचऱ्याच्या तक्रारी नाहीएरवी दररोज कचरा पडून असल्याबाबत तक्रारी असतात. परंतु लॉकडाऊ नमुळे आता अशा तक्रारी नाहीत. घरोघरी कचरागाडी फिरत आहे. बाजारात व रस्त्यावर वर्दळ नसल्याने कचरा पडून राहात नाही. घरातील कचरा रस्त्यावर वा सार्वजनिक जागेवर टाकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. शहरातील रस्ते व बाजार भागात सर्वत्र स्वच्छता दिसत आहे.आयुक्तांच्या आदेशाचाही परिणामशहरातील कचरा संकलनात सुधारणा व्हावी. या हेतूने महापालिकेने दोन कंपन्यांवर कचरा संकलनाची जबाबदारी सोपविली. परंतु या दोन्ही कंपन्यांच्या कामाबाबत नागरिक समाधानी नाहीत. अनेक भागात दैनंदिन कचरा उचलला जात नाही, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाबद्दल या दोन्ही कंपन्यांना लेखाजोखा सादर करावा लागणार आहे. कामाचे मूल्यमापन समाधानकारक नसल्यास कारवाई करण्याचे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. यामुळेही शहरात स्वच्छता दिसण्याला मदत झाली आहे.शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्षलॉकडाऊ नमुळे प्रमुख बाजारात वा रस्त्यावर वर्दळी नसली तरी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे मनपाच्या सर्व झोन कार्यालयांना आपापल्या क्षेत्रात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले आहे. शहरातून सुमारे दररोज ११५० मेट्रिक टन कचरा संकलित होतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून कचरा संकलन घटले असून ते ७०० मेट्रिक टनावर आले आहे. शहरात जागोजागी साचून असलेले कचऱ्याचे ढीग उचलण्याचे निर्देेश दिले आहेत.डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)मनपा