ठळक मुद्देशहर व ग्रामीण भागात सर्वाधिक ६८.७० मिमी पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी ८.४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, नागपूर जिल्ह्यात नागपूर शहर व नागपूर ग्रामीण भागात ६८.७० मि.मी. इतका पाऊस झाला. नागपूर विभागात १ जून ते ८ जून २०१८ पर्यत सरासरी ७४.२६ मिलीमीटर पाऊस पडला आहे.विभागात सोमवारी सकाळपर्यंत नोंदला गेलेला जिल्हानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी १ जूनपासून आजवर झालेल्या पावसाची आहे.नागपूर १६.५३ (११५.५३), वर्धा १५.०१ (९१.६८), गडचिरोली १३.६१ (६७.९८), चंद्र्रपूर २.९१ (७१.५४), गोंदिया २.८५ (३१.४०), तर भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस (६७.४१) पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत.