लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौर संदीप जोशी यांनी २६ आणि २७ सप्टेंबरला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. पण नागपूरकरांनी जनता कर्फ्यू नाकारला असून शनिवारी नागपुरातील सर्वच बाजारपेठा खुल्या होत्या आणि नागरिकांची बाजारात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.कोरोना संसर्गावर कुणीही गंभीर नसल्याचे यावरून दिसून येते.महापौरांच्या १९ आणि २० सप्टेंबरच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व बाजारपेठा बंद होत्या, या शिवाय रस्त्यावर गर्दी नव्हती. पण शनिवार, २६ ला जनता कर्फ्यूचे आवाहन नागपूरकरांनी नाकारल्याचे दिसून येत आहे. जनता कर्फ्यू म्हणजे लोकांनी स्वत:वर बंधन टाकून कोरोना संसर्गावर नियंत्रण आणावे. जनता कर्फ्यूमध्ये व्यापारी आणि लोकांना सहभागी होण्याचे बंधन नाही, हा निर्णय त्यांनीच घ्यावा, असे महापौरांनी घोषणा करताना जाहीर केले होते. गेल्या आठवड्यात पालन झाले, पण यावेळी कुणीही पालन करताना दिसून आले नाही. नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सनेही व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले नाही, हे विशेष.कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता यावर कुणीही गंभीर दिसून येत नाही. याउलट कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी दुकानदार गंभीर झाले आहेत. पूर्वी ऑड-इव्हन रद्द करावे आणि दुकाने रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्यासाठी आंदोलन करणाºया दुकानदारांनी आता दुकाने जास्तवेळ सुरू न ठेवण्याचे बंधन स्वत:वर टाकले आहे. प्रकृती सुदृढ राहिली तर आयुष्यभर व्यवसाय करता येईल, या मूलमंत्राचे पालन करीत व्यापारी दुकाने सायंकाळी ७ च्या आत बंद करीत आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांनाही घरी लवकरच जाण्यास सांगत आहेत. पुढे सणांचे दिवस आहेत. पुढे बाजारात गर्दी वाढल्यास कोरोना संसर्गावर कोण आवर घालणार, असा प्रश्न लोकांच्या बेजबाबदार वागणुकीने उपस्थित झाला आहे.
नागपूरकरांनी नाकारला जनता कर्फ्यू : सर्व बाजारपेठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 9:31 PM
महापौर संदीप जोशी यांनी २६ आणि २७ सप्टेंबरला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. पण नागपूरकरांनी जनता कर्फ्यू नाकारला असून शनिवारी नागपुरातील सर्वच बाजारपेठा खुल्या होत्या आणि नागरिकांची बाजारात व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.कोरोना संसर्गावर कुणीही गंभीर नसल्याचे यावरून दिसून येते.
ठळक मुद्देलोक करताहेत बाजारात गर्दी