नागपूर : दी काैन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) ने आयसीएसई म्हणजे दहावी व आयएससी म्हणजे बारावीचा निकाल शनिवारी घोषित केले. यात नागपूर शहराचा निकाल १०० टक्के लागला. राज्यात दोन्ही वर्गाच्या परीक्षेत १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयसीएसईत ९९.९९ टक्के व आयसीसीचा ९९.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीत कमी आली आहे. कोरोनामुळे सीआयएससीईने दहावी व बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या माध्यमातून निकाल घोषित करण्यात आला. परीक्षा झाल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांना निकालाच्या बाबतीत उत्सुकता होती. नागपुरातील तीन शाळेत आयसीएसई व एका शाळेत आयएससी अभ्यासक्रम शिकविला जातो. शाळांकडून मिळालेल्या माहितीनुसार निकाल १०० टक्के लागला आहे.
साक्षी रंजन विदर्भ रिजनमधून प्रथम ()
चंदादेवी सराफ स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजची साक्षी रंजन ही विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत विदर्भ रिजनमधून प्रथम आली. तिला ९७.२० टक्के गुण मिळाले. तर प्रेरणा बघेले हिला ९७ टक्के व सरगम गोडबोले या विद्यार्थिनीला ९६.८० टक्के गुण मिळाले, तर ६१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले. शाळेचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून, श्रीनभ अग्रवाल याने बारावीत ९५.३० टक्के, वंशिका शर्मा हिने ९४ टक्के, साक्षी त्रिपाठी हिने ९२ टक्के गुण मिळविले.