शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

नागपुरात  निवृत्त पोलीस कर्मचारी अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 10:11 PM

भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे एक निवृत्त पोलीस कर्मचारी ठार झाला. हरिराम पृथ्वीपाल यादव (वय ६८) असे मृताचे नाव आहे. ते मानकापुरातील रोज कॉलनीत राहत होते. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रकचालकाची बेदम धुलाई करून वाहतूक रोखली होती.

ठळक मुद्देभरधाव ट्रकची धडक : अवस्थीनगरात अपघात, प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे एक निवृत्त पोलीस कर्मचारी ठार झाला. हरिराम पृथ्वीपाल यादव (वय ६८) असे मृताचे नाव आहे. ते मानकापुरातील रोज कॉलनीत राहत होते. गुरुवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने ट्रकचालकाची बेदम धुलाई करून वाहतूक रोखली होती.

हरिराम यादव पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर मानकापुरात स्थायीक झाले. त्यांचा राकेश नामक मुलगा गुन्हेशाखेत तर, दुसरा लकडगंज ठाण्यात पोलीस म्हणून कार्यरत आहे. घरगुती कामाच्या निमित्ताने यादव गुरुवारी दुपारी दुचाकीने घराबाहेर पडले. ते अवस्थीनगर रिंग रोडवरून जात होते. अचानक वळणावर त्यांना आयशर ट्रक (एमएच ०४/ जीआर २३१२) च्या चालकाने समोरून जोरदार धडक मारली. त्यामुळे दुचाकीचालक यादव जागीच गतप्राण झाले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी भरदुपारी हा अपघात घडल्याने आजूबाजूच्यांनी धाव घेतली. त्यांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालक शेर बहादूर यादव याला पकडून त्याची बेदम धुलाई केली. काहींनी ट्रकवर दगडफेक केली. टँक फोडून आगही लावण्याचे प्रयत्न केले. मात्र काहींनी समंजसपणा दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, अपघातस्थळी प्रचंड गर्दी जमली होती. याचवेळी कॉग्रेसच्या संघर्ष यात्रेतील कार्यकर्ते तिकडून जात होते. त्यांनीही तेथे जमून जोरदार घोषणाबाजी केली. या मार्गावरची वाहतूक व्यवस्था चांगली करण्यात यावी, अशी मागणी करून वाहतूक रोखली. परिणामी तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला. अपघाताची माहिती कळताच मानकापूर तसेच गिट्टीखदान पोलिसांचे गस्ती पथक तसेच वाहतूक शाखेचे पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी संतप्त जमावाची कशीबशी समजूत काढली. तत्पूर्वी, जमावाच्या तावडीतून आरोपी ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले. नंतर गिट्टीखदान पोलिसांनी त्याला अटक केली.नेहमीच होतात अपघातवर्दळीचा मार्ग असूनही वाहतूक पोलीस सतर्कपणे काम करीत नसल्याने या भागातील वाहतूक कमालीची बेशिस्त झाली आहे. त्यामुळे नेहमीच अपघात होतात. संतप्त जमावाने हा मुद्दा लावून या भागात सिग्नल तसेच चौकात नेहमी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मागणीच्या पूर्ततेचे आश्वासन दिल्यामुळे तणाव निवळला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू