लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विशाल पटांगणावर शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले आबालवृद्ध, सूर्यनारायणाच्या साक्षीने एकाच वेळी लयबद्ध हालचालीत होणाऱ्या योगमुद्रा व ओंकारनादाचे सूर...अशा भारावलेल्या व सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वातावरणात नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे नागपूरकरांनी योगसंस्कारांचा अनोखा अनुभव घेतला. शहरातील हजारो आबालवृद्धांनी सांघिक योगासन करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी विद्यार्थ्यांनी लयबद्ध स्वरूपात योगमुद्रेचे प्रदर्शन केले.योग समन्वय समिती नागपूर तसेच नागपूर महानगरपालिकेतर्फे गुरुवारी चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विभागीय आयुक्त अनुप कुमार, महानगरपालिका आयुक्त वीरेंद्र सिंह, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाहक आणि ज्येष्ठ योगगुरू रामभाऊ खांडवे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी योगाभ्यासी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, विवेकासन, योगमुद्रा, मत्स्यासन, पर्वतासन, ताडकटी चक्रासन, पश्चिमोत्तान आसन, गोमुखासन इत्यादी योग प्रकार सादर केले.यावेळी स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक, माजी महापौर प्रवीण दटके, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रजनी दीदी, मनीषा दीदी, एनसीसीचे ग्रुप कमांडर योगेंद्र पै, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा व निसर्गोपचार संघटनेच्या डॉ. कीर्तिदा अजमेरा, जयप्रकाश गुप्ता, दयाशंकर तिवारी, भोजराज डुंबे हेदेखील उपस्थित होते. यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रजनी दीदी यांनी राजयोगावर मार्गदर्शन केले. दयाशंकर तिवारी यांनी संचालन केले तर दिलीप दिवे यांनी आभार मानले.घराघरापर्यंत पोहोचावी योग चळवळ : बावनकुळे
नागपुरात लयबद्ध योगमुद्रांनी फेडले डोळ्यांचे पारणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 9:23 PM
विशाल पटांगणावर शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले आबालवृद्ध, सूर्यनारायणाच्या साक्षीने एकाच वेळी लयबद्ध हालचालीत होणाऱ्या योगमुद्रा व ओंकारनादाचे सूर...अशा भारावलेल्या व सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या वातावरणात नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे नागपूरकरांनी योगसंस्कारांचा अनोखा अनुभव घेतला. शहरातील हजारो आबालवृद्धांनी सांघिक योगासन करून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी विद्यार्थ्यांनी लयबद्ध स्वरूपात योगमुद्रेचे प्रदर्शन केले.
ठळक मुद्देयोग दिनानिमित्त एकाच वेळी हजारो नागरिकांचे सांघिक योगासन : आबालवृद्धांनी अनुभवला योगसंस्कार