शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Nagpur Riots: नागपूर दंगल प्रकरणी १३ गुन्ह्यांची नोंद; कर्फ्यूमध्ये शिथिलता येण्याची शक्यता

By योगेश पांडे | Updated: March 21, 2025 20:51 IST

नागपुरातील उपायुक्तांवरील हल्ला व महिला पोलीसांच्या विनयभंगाची चौकशी गुन्हे शाखेकडे

योगेश पांडे 

नागपूर : सोमवारी नागपुरात झालेल्या दंगल प्रकरणात आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीने झालेला हल्ला तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंगाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे. तसेच कामठी येथील घटनेशी संबंधित सायबर पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काही ठिकाणच्या कर्फ्यूमध्ये शिथिलता येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाल दंगलीदरम्यान हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान यांच्यासह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर सोशल मीडियाद्वारे हिंसाचाराचे उदात्तीकरण करण्याचा आणि इतरांना सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे त्याचा जुना सहकारी सय्यद अली याच्या सहभागाबाबतदेखील तपास सुरू आहे. सय्यद अली अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.

शुक्रवारी कडेकोट बंदोबस्तरमझानचा महिना सुरू असून शुक्रवारच्या नमाजाचे महत्त्व लक्षात घेता तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय शहरातील संवेदनशील ठिकाणीदेखील पोलीस तैनात होते. शहरात शुक्रवारीदेखील शांतता दिसून आली.

कधी उठणार कर्फ्यू ?महाल-हंसापुरीत पसरलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी शहरातील अकरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावला होता. मात्र, गुरुवारी सकाळी पोलिसांनी नंदनवन व कपिलनगरमधील कर्फ्यू हटविला, तर सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी दोन ते चार या कालावधीत शिथिलता दिली होती. मात्र रात्री सक्करदरा, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, इमामवाडा, सक्करदरा व यशोधरानगर येथील शिथिलता रद्द केली. त्यामुळे सद्यस्थितीत नऊ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू कायम आहे. शांतता प्रस्थापित झाल्याने आता तरी संवेदनशील जागा वगळता इतर ठिकाणचा कर्फ्यू उठवावा अशी मागणी समोर येते आहे.

टॅग्स :nagpurनागपूर