शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

नागपुरात गुंगीचा स्प्रे मारून होतेय लुटमार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 10:06 AM

चोर-भामट्यांनी सर्वसामान्य नागरिक खासकरून महिलांना लुटण्याची खास पद्धत अवलंबिली आहे. काही क्षणासाठी गुंगी आणणारा स्प्रे चेहऱ्यावर मारून ते महिलांचे दागिने, पर्स किंवा पर्समधील दागिने लुटून नेत आहेत.

ठळक मुद्देक्षणात होतो रोख, मौल्यवान ऐवज लंपासपोलिसांकडे अधिकृत नोंदच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोर-भामट्यांनी सर्वसामान्य नागरिक खासकरून महिलांना लुटण्याची खास पद्धत अवलंबिली आहे. काही क्षणासाठी गुंगी आणणारा स्प्रे चेहऱ्यावर मारून ते महिलांचे दागिने, पर्स किंवा पर्समधील दागिने लुटून नेत आहेत. लुटमारीचा हा प्रकार एवढा अफलातून आहे की लुटल्या गेलेल्या व्यक्तीला त्याची कल्पनाच येत नाही. नागपुरात असे प्रकार अनेक ठिकाणी घडले तरी स्प्रे मारून चोरल्याची अधिकृत नोंद पोलिसांकडे नाही.प्रारंभी गर्दीच्या ठिकाणी चोर-भामटे नागरिकांचे खिसे कापायचे. त्यावेळी पुरुषांचेच दागिने लुटले जायचे, नंतर महिलांचे दागिने हिसकावून नेण्याचे (चेनस्नॅचिंग) प्रकार वाढले. त्यानंतर महिलांच्या दागिन्यांसोबतच त्यांच्या पर्स हिसकावून नेण्याचे प्रकार सुरू झाले. अलीकडे महिलांच्या बॅगमधून छोटी पर्स किंवा आतमधील दागिने आणि रोकड बेमालूमपणे काढून घेण्याचे प्रकार वाढले असून, हे प्रकार सर्रासपणे सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येते. ते कुठेही घडतात. रस्त्यावर घडतात अन् धावत्या बसमध्ये किंवा ऑटोतही घडतात. लुटारूंनी त्यासाठी नवी क्लृप्ती योजली आहे. काही क्षणासाठी गुंगी आणणारा पदार्थ चेहऱ्यावर (नाकासमोर) फवारला (स्प्रे) जातो. त्यानंतर दागिने किंवा रोख रक्कम असलेली पर्स चोरून चोरटे पसार होतात. अवघ्या काही क्षणात या चोरीच्या घटना घडतात आणि पीडित व्यक्तीला त्याचे दागिने किंवा रोख चोरीला गेल्याचे काही वेळेनंतर माहितही होते, मात्र तोपर्यंत चोरटा पसार झालेला असतो.अशा प्रकारे चोरी करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांच्या टोळ्या जास्त सक्रिय आहेत. नागपुरातील सर्वच भागात त्यांचा धुमाकूळ सुरू असला तरी सीताबर्डी, सदर, पाचपावली, जरीपटका यासारख्या भागात या टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे सांगितले जाते. सीताबर्डी मोरभवन, बाजारपेठ, सदर बाजारपेठ, जरीपटका बाजारपेठ, सेंट्रल एव्हेन्यू, गांधीबाग, इतवारी बाजार, मध्यवर्ती बसस्थानक, शहरातील ठिकठिकाणचे बसथांबे, ऑटो स्टॅण्डच्या परिसरात या टोळ्या घुटमळत असतात. एकटी महिला त्यांचे ‘सॉफ्ट टार्गेट’ असते. बसमध्ये किंवा आॅटोतून प्रवास करताना तिच्या आजूबाजूला जागा करून दोन-तीनच्या संख्येतील महिला बेमालूमपणे बॅगमधील पर्स, पाकीट किंवा रोख रक्कम चोरून घेतात. रस्त्यात पैशाची गरज पडल्यानंतर महिला जेव्हा आपल्या बॅगमध्ये हात घालते तेव्हा तिला आपली पर्स, रोख, दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येते.छावणी, सेंट्रल एव्हेन्यूवर घटनाअनेक महिलांना घरी पोहचल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात येतो. त्यातल्या त्यात आपल्यावर विशिष्ट स्प्रे मारून काही क्षणांसाठी गुंगी येणाऱ्या पदार्थाचा लुटारूने वापर केल्याचे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे पोलिसांकडे तक्रार नोंदवताना असा काही प्रकार घडल्याचे पीडित तक्रारदार तक्रारीत लिहित नाहीत. सदर-छावणीमध्ये काही दिवसांपूर्वी पायी जाणाऱ्या महिलेवर स्प्रे मारून तिची पर्स हिसकावून नेण्याचा एक प्रकार घडला तर, सेंट्रल एव्हेन्यूवर एका कारमध्ये बसलेल्या महिलेवरही भामट्यांनी असा स्प्रे मारून त्यांची पर्स लंपास करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला.कुलरवर स्प्रे करून चोरीउन्हाळ्यात बहुतांश घरात दिवसरात्र कुलर सुरू असतात. कुलर घराच्या बाहेर (खिडकीत) पोर्च, गॅलरीत असतात. अशा स्थितीत चोर-भामट्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ते कुलरवर गुंगीचे औषध असलेला स्प्रे मारतात. त्यामुळे घरातील मंडळींना गाढ झोप येते. त्याचा फायदा उठवत भामटे दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करतात आणि घरातील मंडळींच्या उपस्थितीतच रोख आणि मौल्यवान चिजवस्तू लंपास करतात. गेल्या वर्षी शहरात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या होत्या.नागरिकांनो सतर्कता बाळगाअनेकदा पत्ता विचारण्याचा बहाणा करून हे लुटारू पीडितांना उभे राहण्यास बाध्य करतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलताना किंवा आपल्या बाजूला (बस, ऑटोत) कोण बसून आहे, त्याच्या हालचालीकडे नजर ठेवण्याची गरज आहे. खासकरून त्याच्या हातात काय आहे, यावर विशेष नजर ठेवणे गरजेचे आहे. त्याचा चेहरा, तो कोणत्या वाहनावर आहे, त्याच्यासोबत दुसरे कुणी आहे काय, त्यावरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अचानक कुणी आपल्या चेहऱ्यासमोर हात आणण्याचा प्रयत्न केल्यास मागे वळून आरडाओरड केल्यास, संभाव्य गुन्हा टाळता येतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी