शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

.. तर नागपुरात धावपट्टीची लांबी कमी होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 11:32 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताल बांधण्यात आलेल्या इमारतींच्या अवैध उंचीच्या बांधकामामुळे विमानाचे उड्डाण आणि उतरण्याला धोका निर्माण झाला आहे. मनपाने पुढाकार घेऊन इमारतींची अवैध उंची पाडावी. त्यामुळे विमानतळाची धावपट्टीची लांबी कमी करण्याचा प्रश्नच नाही, असे मत मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) वरिष्ठ विमानतळ व्यवस्थापक विजय मुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देमनपाने इमारतींचे अवैध बांधकाम तोडावे : ‘एमआयएल’तर्फे कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताल बांधण्यात आलेल्या इमारतींच्या अवैध उंचीच्या बांधकामामुळे विमानाचे उड्डाण आणि उतरण्याला धोका निर्माण झाला आहे. मनपाने पुढाकार घेऊन इमारतींची अवैध उंची पाडावी. त्यामुळे विमानतळाची धावपट्टीची लांबी कमी करण्याचा प्रश्नच नाही, असे मत मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) वरिष्ठ विमानतळ व्यवस्थापक विजय मुळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.मिहान इंडिया लिमिटेडच्यावतीने ‘विमानतळालगतच्या उंच इमारतींना ना-हरकत प्रमाणपत्र’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन बुधवारी वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये करण्यात आले. लोकांच्या जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत बांधकामाशी संबंधित मनपा, नासुप्र, नगररचना विभाग, एनएमआरडी, महामेट्रो विभागाचे अधिकारी, क्रेडाई, वेद संस्थांचे पदाधिकारी, आठ नगरसेवकांसह एकूण ७० जण उपस्थित होते. कार्यशाळेत नागरी विमान प्राधिकरणाचे (मुख्यालय, कॉर्पोरेट कम्युनिकेशन) उपमहाव्यवस्थापक संजीव शाह आणि सहायक महाव्यवस्थापक (एनओसी) संजय कार यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुळेकर म्हणाले, उंच इमारतींबाबत संबंधित विभागाला पत्र लिहिले आहे. याशिवाय मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) याची माहिती महापालिकेला देऊन ८ ते १० इमारतींना नोटिसा जारी केल्या आहेत. त्यानंतरही मनपाने अवैध बांधकाम पाडण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही. ज्या इमारतींना नोटीस जारी केल्या आहेत, त्या अपीलमध्ये गेल्या आहेत. वेळीच पाऊल उचलले नाही तर विमानांचे उड्डाण आणि उतरण्याला धोका निर्माण होऊ शकतो.मंजुरीसाठी एक खिडकी योजनाविमानतळाच्या २० कि़मी. चौरस क्षेत्रात इमारतींच्या बांधकामाला मंजुरी हवी असेल तर आता केंद्र आणि राज्य सरकारने एक खिडकी योजना सुरू केली आहे. त्यामुळे १० ते १२ विभागाकडे मंजुरीसाठी जावे लागणार नाही. एएआयने कलर कोडिंग झोनिंग मॅप वेबसाईट प्रकाशित केली आहे. सर्व अधिकार मनपाला राहणार असून त्यांना ‘नोकॉस’ (नो आॅब्जेक्शन सर्टिफिकेट अप्लिंकेशन सिस्टीम) लोड करायची आहे. ही यंत्रणा संबंधित सर्व विभागाशी जोडण्यात येणार आहे. मॅपनुसार मनपाने इमारतींना मंजुरी दिल्यास एएआय मॅप पाहून मंजुरी प्रदान करणार आहे. कुठल्याही झंझटीविना ही प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण होणार आहे.सॉफ्टवेअरसंदर्भात एएआय व एमआयडीसीशी करार होणार आहे. ही यंत्रणा मुंबई, दिल्ली येथे कार्यान्वित झाली असून नागपुरात ३१ मार्च २०१९ पूर्वी सुरू होईल.विमानतळाच्या सभोवतालच्या इमारतींचे सर्वेक्षण होणारविमानांच्या उड्डाणाला धोका ठरणाऱ्या इमारतींचे नाशिक येथील राज टेक्नॉलॉजी कंपनी सर्वेक्षण करणार आहे. आॅक्टोबरमध्ये सर्वेक्षण पूर्ण होईल. त्याचा अहवाल डीजीसीएला पाठविण्यात येणार असून विमानांना अडथळा ठरणाºया इमारतींच्या संदर्भात डीजीसीए जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देऊन अवैध बांधकाम पाडण्यासंदर्भात सांगणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित विभागाला निर्देश देतील. ही प्रक्रिया योग्यरीत्या पार पडली तर धावपट्टीची लांबी कमी करण्यावर विचारही होणार नाही. नागपूर विमानतळाची धावपट्टी ३२०० मीटर आहे. इमारतींच्या अवैध बांधकामामुळे ५६० मीटर धावपट्टी कमी होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली होती. एमआयएलने दोन उंच इमारतींचे ना-हरकत प्रमाणपत्र रद्द केले आहे. यापूर्वी विमानतळाला धोका निर्माण होऊ पाहणाऱ्या मुंबईतील लाला पेन्टा हॉटेलचे दोन मजले पाडण्यात आल्याचे मुळेकर यांनी सांगितले. यावेळी एएआयचे महाव्यवस्थापक (एटीसी) युधिष्ठिर शाहू आणि सहय्यक महाव्यवस्थापक शफीक शाह उपस्थित होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर