शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

नागपूर ग्रामीण भागात अवघ्या ५०० रुपयासाठी होतेय जीवघेणी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 5:27 PM

बँक खातेदारांनी शासनाने खात्यात जमा केलेल्या केवळ ५०० रुपयांची उचल करण्यासाठी बँक शाखामध्ये जीवघेणी गर्दी केली आहे. हा प्रकार सात दिवसापासून सुरू आहे. मात्र, याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.

ठळक मुद्देकोरोना उपाययोजनांची पायमल्ली ‘ब्रेक’ लावण्यासाठी पुढाकार घेणार कोण?

श्याम नाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याच्या सूचना केल्या असल्या तरी राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रमांमध्ये आणि गरीब लाभार्थी बँक शाखांमध्ये याची पायमल्ली करीत आहेत. बँक खातेदारांनी शासनाने खात्यात जमा केलेल्या केवळ ५०० रुपयांची उचल करण्यासाठी बँक शाखामध्ये जीवघेणी गर्दी केली आहे. हा प्रकार सात दिवसापासून सुरू आहे. मात्र, याला ‘ब्रेक’ लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदीमुळे मजुरी करून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना शासनासह विविध सामाजिक संघटनांच्यावतीने मदतही केली जात आहे. याच काळात केंद्र शासनाने नागरिकांच्या जनधन खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा केले आणि या रकमेची उचल करण्यासाठी खातेदारांनी कशाचीही पर्वा न करता बँकेकडे धाव घेतली. दुसरीकडे, या रकमची वेळीच उचल न केल्यास ती परत जाईल, अशा अफवाही पसरविण्यात आल्या. या अफवांच्या मुळाशी नेमके कोण आहे, याचा तपास करण्याच्या भरीस कुणी पडत नाही.बहुतांश जनधन खाती देवाणघेवाण न केल्याने ती पूर्वीच ‘इन अ‍ॅक्टिव्ह’ झाली आहेत. त्यामुळे बँक कर्मचारी ही खाती वेळेवर ‘केवायसी’ करीत ‘अ‍ॅक्टिव्ह’ करीत आहेत. या प्रक्रियेत प्रत्येकी १५ ते २० मिनिट जात असून बँक कर्मचाऱ्यांना ‘इंटरनेट स्पीड‘ व ‘सर्व्हर डाऊन’च्या समस्येचा सामना करावा लागत आहे. उन्हामुळे खातेदारांचेही हाल होत आहे. त्यांना साधे पिण्याचे पाहणीही मिळत नाही. हा प्रकार तालुक्यातील नरखेडसह मोवाड, सावरगाव, जलालखेडा, थडीपवनी, भारसिंगी, लोहारीसावंगा, भिष्णूर व इतरही ठिकाणच्या बँक शाखांमध्ये दिसून येतो. काही शाखांसमोर पेन्डॉल तयार केले आहेत.

दार बंद करून कामकाजया गर्दीत इतर खातेदार, शेतकरी, निवृत्ती वेतनधारक व व्यापाऱ्यांनीही भर टाकली आहे. गर्दी टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी बँकांचे दार बंद करून कामकाज करणे सुरू केले आहे. दारातून कर्मचाऱ्याला पासबुक, विड्रॉवल स्लिप दिली जाते. विशेष म्हणजे, जनधन, निवृत्तीवेतन व काही शासकीय योजनांच्या खातेदारांना एटीएम कार्ड दिले जात नाही. शिवाय, तालुक्यातील ९० टक्के एटीएममध्ये अलीकडच्या काळात रक्कम भरली नाही.

बँक कर्मचाऱ्यांचे ‘अप-डाऊन’नरखेड तालुक्यातील प्रत्येक राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. ते रोज नागपूर शहरातून खासगी वाहनांनी शाखांमध्ये ये-जा करतात. या काळात ते अनेकांच्या संपर्कात येतात. त्यात कोण कोरोनाबाधित आहे, याची माहिती त्या कर्मचाऱ्यांनाही नसते. सध्या तालुक्यात एकही कोरोनाबाधित किंवा संशयित नाही. परंतु, बँक कर्मचाऱ्यांचा हा प्रवास खातेदारांसह त्यांच्या कुटुंबीयांसाठी धोकादायक ठरू शकतो.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस