शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

नागपूर ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’,८७ लाखांचे तडजोडशुल्क वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 11:10 PM

नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील जिल्हा वाहतूक पोलिसांची वर्षभरातील कामगिरी ही दमदार राहिलेली आहे. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिट, विना हेल्मेट अशा केसेससह राँग साईड आणि मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात चालविलेली मोहीम आणि कारवाईचा आलेख पाहता ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’ असल्याचे स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे अपघाताच्या घटनांमध्येही घट झाली असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी झाली.

ठळक मुद्दे२४६८ अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतील जिल्हा वाहतूक पोलिसांची वर्षभरातील कामगिरी ही दमदार राहिलेली आहे. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सिट, विना हेल्मेट अशा केसेससह राँग साईड आणि मोटर वाहन कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात चालविलेली मोहीम आणि कारवाईचा आलेख पाहता ग्रामीण वाहतूक पोलीस ‘अ‍ॅक्टिव्ह’ असल्याचे स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे अपघाताच्या घटनांमध्येही घट झाली असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी झाली.वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते ३१ मे २०१७ २०१७ शी १ जानेवारी ते ३१ मे २०१८ सोबत तुलना करून ‘ग्राफ’ बनविला. त्यात अपघातामध्ये घट आणि कारवाईमध्ये अग्रेसर असल्याचे स्पष्टपणे दिसते. जिल्हा वाहतूक शाखेने जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस स्टेशन आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यावतीने वेळोवेळी कारवाई केली. त्यामुळेच हे यश वाहतूक शाखेला येऊ शकले. विना हेल्मेट मोटरसायकल चालविणे, ट्रिपल सिट मोटरसायकल चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, वाहनावर रिफ्लेक्टर नसणे, स्कूल बस चालकाने युनिफॉर्म न वापरणे, स्कूल बसमध्ये अटेंडंट नसणे, वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र नसणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, बसस्थानकाजवळ २०० मीटरच्या आत वाहन पार्क करणे, धोकादायकरीत्या रस्त्याच्या कडेला वाहन उभे करणे, ओव्हरलोड वाहतूक करणे आदीसंबंधांने वाहतूक पोलिसांनी मोहीम राबविली.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक (गृह) कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक आसिफ शेख, त्यांचे पथक, जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि कर्मचाऱ्यांनी मोहिमेला हातभार लावला.अपघातप्रवण स्थळाची यादी, उपाययोजनाजिल्हा वाहतूक शाखेने नागपूर जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांची यादी तयार केली. त्यासंबंधाने तेथे उपाययोजना केली. तेथे फलक लावले. त्यामुळेच अपघाताचे प्रमाण कमी झाले. १ जानेवारी ते ३१ मे २०१७ या कालावधीत १५० अपघात होऊन १६१ जणांना जीव गमवावा लागला. तर या अपघातांमध्ये ५१९ जण जखमी झाले. तर १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या कालवधीत अपघातांची संख्या घटून ती १२७ पर्यंत आली. त्यामध्ये १३७ जणांचा मृत्यू तर ४२७ जण जखमी झाले. वाहतूक शाखेने केलेल्या उपाययोजनेमुळेच हे शक्य झाले. केवळ पाच महिन्यांचा हा आलेख आहे, हे विशेष!कारवाईमध्ये वाढवाहतूक शाखेने १ जानेवारी ते ३१ मे १७ पेक्षा १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या कालावधीत कारवाईची संख्या वाढून तडजोड शुल्कही मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात आले. १ जानेवारी २०१७ ते ३१ मे २०१७ या कालावधाीत अवैध प्रवासी वाहतुकीची २२२१ कारवाईसह राँग साईड वाहन चालविणे तसे इतर मोटर वाहन अशा एकूण २२ हजार ३१८ केसेस नोंदविल्या गेल्या. तर १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या पाच महिन्यांत २४६८ अवैध प्रवासी वाहतूक, २१३६ राँग साईड केसेस, इतर मोटर वाहन केसेस २० हजार ६१९ अशा एकूण २५ हजार २२३ कारवाई नोंदविल्या गेल्या. यामध्ये तब्बल २५१४ कारवाई मागील वर्षीपेक्षा अधिक आहे. एवढेच काय तर २०१७ च्या कालावधीत ८२ लाख ३ हजार ७०० रुपये आकारण्यात आलेल्या तडजोड शुल्कात २०१८ मध्ये वाढ झाली. १ जानेवारी ते ३१ मे २०१८ या कालावधीत ८७ लाख ४१ हजार ९०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करून शासन दरबारी जमा करण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी