कन्हैया कुमार : सक्रिय राजकारणाचे संकेतनागपूर : नागपूर ही संघभूमी असल्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात तर नागपूर ही डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी पवित्र झालेली दीक्षाभूमीच आहे. नागपूर गोळवलकरांचे नव्हे तर डॉ.आंबेडकरांचे आहे, असे प्रतिपादन कन्हैया कुमार याने गुरुवारी केले. धनवटे नॅशनल कॉलेज येथे झालेल्या जाहीर सभेदरम्यान त्याने विविध मुद्दे उचलत केंद्र शासनावर टीका केली.मी नागपुरात कुठलाही संदेश द्यायला आलो नाही, तर डॉ.आंबेडकरांचा संदेश घेण्यासाठी आलो आहे. या मातीत त्यांचे संस्कार आहे. नागपुरात केवळ ‘हाफपॅन्ट’वाले लोक राहत नाहीत, तर पूर्ण डोके असलेल्यादेखील अनेक व्यक्ती आहेत. मी प्रत्येक वर्षी १४ एप्रिल रोजी नागपुरात येईल असे तो म्हणाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केंद्र शासनाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु केवळ मतांसाठी हे करण्यात येत आहे. जर खरेच हिंमत असेल तर हिंदुत्ववाद्यांनी मनुस्मृती जाळून दाखवावी, असे आवाहन त्याने केले.विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ‘जेएनयू’तून सुरू झालेले आंदोलन विविध विद्यापीठांमध्ये पसरले. नागपूर हे देशाचे केंद्रस्थान आहे. नागपुरातदेखील विरोधाचा ‘दांडा’ चालला पाहिजे व सामाजिक न्यायासाठी हे केंद्र व्हावे, असेदेखील तो म्हणाला. कन्हैयाच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आले होते. कार्यक्रम सुरू होण्याअगोदरच सभागृह ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. (प्रतिनिधी)अनेक जणांना बाहेरच उभे रहावे लागले. (प्रतिनिधी)मोदी ‘आयएसडी’ पंतप्रधानजम्मू-काश्मीरमधील ‘एनआयटी’मध्ये स्थानिक व बाहेरील लोकांमुळे तणाव निर्माण झाला असे केंद्र सरकार म्हणत आहे. नरेंद्र मोदी स्वत: ‘आयएसडी’ पंतप्रधान आहेत. त्यांनी ‘लोकल’ आणि ‘एसटीडी’ असे खेळायला नको, अशी टिप्पणी कन्हैया कुमारने केली. नरेंद्र मोदी यांनी खूप आश्वासने दिली होती. परंतु प्रत्यक्षात त्यांची पूर्तता झाली नाही. केवळ श्रीमंतांसाठी ते काम करत असून गरीब चहावाल्याला मात्र विसरले आहेत.
नागपूर संघभूमी नव्हे दीक्षाभूमीच
By admin | Published: April 15, 2016 3:07 AM