शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

नागपुरात स्कूलबस, व्हॅनच्या शुल्कात १० टक्क्याने वाढ : पालकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 8:26 PM

नवीन शैक्षणिक वर्षात आधीच शालेय साहित्य व पुस्तकांच्या शुल्काने पालकांचे कंबरडे मोडले आहे, आता यात स्कूलबस व व्हॅनच्या भरमसाट शुल्काची भर पडली आहे. नागपुरात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ आठ किलोमीटरच्या अंतरासाठी स्कूलबससाठी दरमहा सुमारे १९०० तर स्कूलव्हॅनसाठी १५०० रुपये मोजावे लागणार आहे. ऑटोरिक्षाचे दर किलोमीटरनुसार ठरते, तर स्कूल बसचे का नाही, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देऑटोरिक्षाचे भाडे ठरते, स्कूलबसचे का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवीन शैक्षणिक वर्षात आधीच शालेय साहित्य व पुस्तकांच्या शुल्काने पालकांचे कंबरडे मोडले आहे, आता यात स्कूलबस व व्हॅनच्या भरमसाट शुल्काची भर पडली आहे. नागपुरात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. केवळ आठ किलोमीटरच्या अंतरासाठी स्कूलबससाठी दरमहा सुमारे १९०० तर स्कूलव्हॅनसाठी १५०० रुपये मोजावे लागणार आहे. ऑटोरिक्षाचे दर किलोमीटरनुसार ठरते, तर स्कूल बसचे का नाही, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.शहरात सुमारे ८०० स्कूल बसेस आणि एक हजार स्कूल व्हॅनमधून विद्यार्थ्यांची ने-आण होते. हा आकडा आरटीओचा आहे, मात्र शहरात दोन हजारापेक्षा जास्त स्कूल व्हॅन व १००वर अवैध बसेस धावत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करणाऱ्या स्कूलव्हॅन व बससाठी विशिष्ट नियमावली आहे. परंतु सर्वच नियमांचे पालन करतात असे नाही. स्कूलबसच्या तपासणीलाही फारसे गंभीरतेने घेतले जात नाही. क्षमतेच्या दुप्पट विद्यार्थी घेऊन ही दोन्ही वाहने रस्त्यावरून धावतात. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिली असून आता मनमानी शुल्काकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पालक चिंतेत आहे.बसमध्ये २०० ते ४०० रुपयांची वाढएका खासगी शाळेमूधन स्कूलबस चालविणाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले, पेट्रोल, डिझेलचा दर आता स्थिर राहिलेला नाही. स्कूलबसच्या देखभालीचा, पार्किंगचा खर्च वाढला आहे. याचबरोबर स्कूलबससाठी विशेष नियमावलीचे पालन करावे लागते. यामुळे खर्चात किती तरी टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य सेवासुविधा देण्यासाठी बदल केले आहेत. त्यामुळे या वर्षी २०० ते ४०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.व्हॅनमध्ये १०० ते २०० रुपयांनी वाढशहरात सात ते आठ किलोमीटर अंतरासाठी स्कूल व्हॅनचालक गेल्या वर्षी दरमहा १४०० ते १५०० रुपये आकारत होते, आता यात १०० ते २०० रुपयांनी वाढ केली आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक स्कूलव्हॅन या १५ वर्षांवरील आहे, तर काही जादा फेऱ्या करण्यासाठी बेलगाम धावतात.स्कूलबस व स्कूलव्हॅन उन्हाळ्यासह दिवाळी व नाताळाच्या सुट्यांचेही भाडे वसूल करते. विशेषत: मे महिन्यात शाळा बंद होत्या. तरीही या महिन्याचे शुल्क जबरीने आकारण्यात आल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, सुट्यांच्या दिवसांचे शुल्क आकारले जात असले तरी १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला पालकांनाच विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे लागते.वाहन करातून सूट तरीही भाडे दुप्पटशाळांच्या स्वत:च्या किंवा करार झालेल्या स्कूल बस व स्कूल व्हॅनला वाहन करातून सूट दिली जाते, परंतु त्यानंतरही अनेक बस व व्हॅनकडून दुप्पट भाडे आकारले जात आहे.अवैध वाहतुकीला प्रोत्साहनस्कूल व्हॅन व स्कूल बसचे दर दरवर्षी वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पालकांना नाईलाजाने कमी दरात धावणाऱ्या अवैध वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करावी लागत आहे. काही बस व व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविले जात आहे. एकूणच विद्यार्थ्यांची वाहतूक धोक्यात आली आहे.दर ठरविण्याची जबाबदारी शालेय परिवहन समितीचीस्कूल बस किंवा स्कूल व्हॅनचे दर ठरविण्याची जबाबदारी त्या-त्या शाळेतील शालेय परिवहन समितीची आहे. नुकत्याच झालेल्या शालेय बस सुरक्षितता बैठकीत शहर आरटीओने हा विषय मांडला. बैठकीत शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना याची माहिती देऊन दर ठरविण्याचा सूचना केल्या आहेत.अतुल आदेउपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर आरटीओ८ते १० टक्क्यांनी वाढस्कूल बसच्या तुलनेत स्कूल व्हॅनचे दर कमीच असतात. पेट्रोलचे दर स्थिर राहत नाही. ते वाढतच चालले आहे. यातच व्हॅनचा देखभालीचा खर्च, नियमावलीचे पालन, शाळेला द्यावे लागणारे शुल्क, आरटीओचा कर यातून फार कमी पैसे चालकाच्या हातात पडतात. यामुळे या वर्षी ८-१० टक्क्यांनी स्कूल व्हॅन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.हेमंत गजभियेसचिव, स्कूल व्हॅन चालक संघटना

 

टॅग्स :SchoolशाळाPublic Transportसार्वजनिक वाहतूक