लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंबाझरीतील कुख्यात गुंड राजेश पेठे (वय ३५) याने एका शाळकरी मुलीवर (वय १५) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्याने आरोपीने तिला मारहाण केली. सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली.कुख्यात राजेशच्या वस्तीतच राहणारी पीडित मुलगी दहावीची विद्यार्थीनी आहे. तिला आई-वडील नाहीत, गरीब आजीच्या आश्रयाने ती शिक्षण घेत आहे. ती निराधार असल्याचे माहीत असल्याने कुख्यात राजेश पेठे अनेक दिवसांपासून तिच्या मागे लागला. तो तिचा शाळेत जाता-येता पाठलाग करतो. तिला अश्लील इशारे करून नको तशा शिव्याही देतो. त्याची गुन्हेगारीवृत्ती लक्षात घेता पीडित मुलीने तिच्या आजीला हा प्रकार सांगितला. आजीने त्याच्यापासून धोका होऊ शकते, हे लक्षात घेऊन तिला गप्प बसण्यास सांगितले. त्यामुळे आरोपी निर्ढावला. त्याने तिला सोमवारी शाळेत जाताना छेडले. रात्री १० वाजता तो दारूच्या नशेत तिच्या घरी आला आणि त्याने तिला सोबत चलण्याचा आग्रह धरला. तिने नकार देताच त्याने तिला हात धरून ओढत नेण्याचा प्रयत्न केला. विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली. तिचा आणि आजीची आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यामुळे आरोपी पळाला. शेजाऱ्यांनी धीर दिल्याने आजीने तिला अंबाझरी ठाण्यात नेले. तेथे तिने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राजेश पेठेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नागपुरात शाळकरी मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:54 PM
अंबाझरीतील कुख्यात गुंड राजेश पेठे (वय ३५) याने एका शाळकरी मुलीवर (वय १५) अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्याने आरोपीने तिला मारहाण केली. सोमवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली.
ठळक मुद्देविनयभंगाचा गुन्हा दाखल