लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील ९० टक्के शाळांमध्ये सर्व्हिस रोड नाहीत. स्वत:ची पार्किंग नाही. शासकीय रस्त्यांचाच वापर केला जातो. पोद्दार इंटरनॅशनल शाळेत यामुळेच अपघात घडला. या पार्श्वभूमीवर नागपुरातील सर्व शाळांना सर्व्हिस रोड व स्वत:ची पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, यासंबंधात निर्देश देण्यात आले असून, जिल्हाधिकारी आणि एनएमआरडीतर्फे तशी नोटीस शाळांना बजावण्यात आलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रपरिषदेत दिली.पालकमंत्री म्हणाले, नवीन कायद्याप्रमाणे शाळांसाठी सर्व्हिस रोड आवश्यक आहे. शासकीय रोडचा वापर करता येत नाही. नागपुरातील अनेक शाळांमध्ये सर्व्हिस रोड नाही. तो करणे आवश्यक आहे तसेच पार्किंगचीही मोठी अडचण आहे. शाळा संचालकांना शाळांचा एफएसआय वाढवून इमारतीच्या खाली पार्किंगची व्यवस्था करता येऊ शकते. यासाठी वेळ लागेल, परंतु ते करवे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.‘त्या’ शाळेवर होणार कारवाईदाभा येथील सेंटर पॉर्इंट शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाला विजेची हायटेन्शन लाईन गेल्याने धोका निर्माण झाला आहे. यासंबंधात संबंधित शाळेला नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास कारवाईचा विचार सुरू असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. सोबतच हायटेन्शन लाईन काढून भूमिगत करण्याचा खर्च तब्बल २७०० कोटी रुपये आहे तर मोनोपोलेट करण्याचा खर्च हा २५० कोटी येत आहे. त्यामुळे मोनोपोलेट करण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.
एफसीआयचे धान्य ओळखण्यासाठी वेगळा सिम्बॉल वापरणारमागील काही दिवसांत एफसीआय गोडाऊनमधील धान्य बाजारात पकडण्यात आले. परंतु बाजारातही एफसीआयसारखीच अनेक पोती आढळून आली आहेत. त्यामुळे एफसीआय गोडाऊनमधीलच ते धान्य आहे, हे सिद्ध करता येणे अडचणीचे होत आहे. त्यावर उपाय म्हणून आता एफसीआय गोडाऊनमधील धान्य हे स्पष्टपणे ओळखता यावे यासाठी एक वेगळे सिम्बॉल तयार करण्याबाबत विचार सुरू असल्याचे पालकमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.