सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवेतील प्रदूषण व धूम्रपानाच्या वाढत्या सवयीमुळे फुफ्फुसाच्या आजारात वाढ झाली आहे. भारतात होणाऱ्या विविध कर्करोगापैकी जवळपास ७ टक्के रुग्ण एकट्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने बळी पडतात. भारतीय कर्करोग संस्थेद्वारे केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे ९.२ टक्के लोक फुफ्फुसाच्या कॅन्सरने पीडित आहेत. यात पहिल्या स्थानावर मुंबई (१०.३ टक्के), तर दुसऱ्या स्थानावर नागपूर (८.८ टक्के ) आहे. तिसऱ्या स्थानी पुणे (७.८ टक्के) व चवथ्या स्थानी औरंगाबाद (५.९ टक्के) आहे. धक्कादायक म्हणजे, जून ते डिसेंबर २०१६ या सहा महिन्यात एकट्या नागपूरच्या मेडिकलमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचे तब्बल ४४ रुग्ण आढळून आले होते.जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार जगात फुफ्फुसाच्या आजाराने भारतात सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. १०० कॅन्सर रुग्णांमध्ये १३ रुग्ण हे फुफ्फुसाच्या कॅन्सरने पीडित असतात. भारतात दरवर्षी या कॅन्सरच्या ७० हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते, तर ६० हजारांपेक्षा जास्त रुग्ण या रोगामुळे दगावतात. महाराष्ट्रातही याचे प्रमाण मोठे आहे. आता विदर्भातही याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, विदर्भात सध्याच्या स्थितीत वीज निर्मितीचे १४ प्रकल्प आहेत. परिणामी, या भागात श्वसनाच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणाची टक्केवारी वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.जगात १०० कोटी लोक धूम्रपानाच्या धुरातफुफ्फुसाच्या कॅन्सरचे मुख्य कारण हे धूम्रपान व हवेतील प्रदूषण आहे. मेडिकलच्या क्षय व उररोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, जगात कमीतकमी एक चतुर्थांश लोक बंद खोलीतील विषारी धुरांना सामोरे जातात. १०० कोटी लोक विषारी वायू श्वासोच्छवासाद्वारे घेतात, तर १०० कोटी लोक धूम्रपानाच्या विषारी धुराचा सामना करतात. या धुरामुळे श्वसनक्रियेचा आजार होण्याची दाट शक्यता असते. १९६४ पासून ते आतापर्यंत जवळपास २५ लाख लोक जे धूम्रपान करीत नव्हते त्यांचा धूम्रपानाच्या धूरामुळे मृत्यू झाला आहे.युवकांना धूम्रपान न करण्यास प्रेरित करायुवकांना धूम्रपान न करण्यास प्रेरित करणे व इतर लोकांची धूम्रपानाच्या व्यसनातून सुटका करणे हाच यावर एक उपाय आहे. रोज धूम्रपान करणाऱ्यांमध्ये श्वसनप्रक्रियेची क्षमता कमी कमी होत जाते. गर्भवती असताना धूम्रपान न केल्यास व बाळंतपणानंतर धूम्रपानाच्या धुराच्या समोर न गेल्यास बाळांमध्ये दम्याची गंभीरता कमी होते. निरोगी फुफ्फुसे ठेवण्याकरिता नियमितपणे तपासणी आवश्यक ठरते.डॉ. सुशांत मेश्रामविभाग प्रमुख क्षय व उररोग विभाग, मेडिकल