लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसात शहरातील तापमान ४७ अंशाच्या आसपास पोहचले आहे. उकाड्यामुळे पाण्यासाठी अनेकदा लोक बेकायदेशीररीत्या टिल्लू पंप वापरून जास्तीचे पाणी घेण्यास सुरुवात करतात. यामुळे इतरांना पाणी मिळत नाही. हा प्रकार बेकायदेशीर असून टिल्लू पंपाचा वापर मनपाच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय गुन्हा आहे. त्यानुसार महापालिका व ओसीडब्ल्यू यांनी हाती घेतलेल्या मोहिमेंतर्गत २१५ टिल्लू पंप जप्त करण्यात आले आहेत. तसेच टिल्लू पंप वापरणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून नळजोडणी खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.ओसीडब्ल्यू व जलप्रदाय विभागाने शहरात टिल्लू पंपाचा वापर होणारे भाग शोधले आहेत. त्यानुसार झोन-निहाय विशेष चमू गठित करून छापा मारणे, पंप जप्ती व कायदेशीर कारवाईसाठी तक्रार नोंदविण्याची प्रक्रीया सुरू आहे. टिल्लू पंपाचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते.
नागपुरात २१५ टिल्लू पंप जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 9:56 PM
गेल्या काही दिवसात शहरातील तापमान ४७ अंशाच्या आसपास पोहचले आहे. उकाड्यामुळे पाण्यासाठी अनेकदा लोक बेकायदेशीररीत्या टिल्लू पंप वापरून जास्तीचे पाणी घेण्यास सुरुवात करतात. यामुळे इतरांना पाणी मिळत नाही. हा प्रकार बेकायदेशीर असून टिल्लू पंपाचा वापर मनपाच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय गुन्हा आहे.
ठळक मुद्देमनपा व ओसीडब्ल्यूची कारवाई