शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

नागपूर  सत्र न्यायालय : हनीसिंगला व्यक्तिश: हजर होण्याचा आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:54 PM

सत्र न्यायालयाने शुक्रवारी लोकप्रिय रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याला विदेशात जाण्याची सशर्त परवानगी दिली. तसेच, भारतात परत आल्यानंतर २४ एप्रिल २०२० रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित राहून अटी व शर्तीचे पालन केल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे असे निर्देश दिले.

ठळक मुद्देविदेशात जाण्याची सशर्त परवानगी

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : सत्र न्यायालयाने शुक्रवारी लोकप्रिय रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याला विदेशात जाण्याची सशर्त परवानगी दिली. तसेच, भारतात परत आल्यानंतर २४ एप्रिल २०२० रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित राहून अटी व शर्तीचे पालन केल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे असे निर्देश  दिले. प्रकरणावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुभाष कऱ्हाळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.हनीसिंगने दुबई, अ‍ॅमस्टरडॅम व अमेरिका येथे जाण्याची परवानगी मिळावी याकरिता अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तो अर्ज मंजूर करून त्याला २० डिसेंबर २०१९ ते १९ एप्रिल २०२० पर्यंत विदेश प्रवास करण्याची परवानगी दिली. त्यासाठी न्यायालयाने ठेवलेल्या अटी व शर्तीनुसार हनीसिंगला २३ एप्रिल २०२० रोजी पाचपावली पोलीस ठाण्यात स्वत: उपस्थित राहून त्याचा रहिवासी पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेलची माहिती सादर करायची आहे. तसेच, १० जानेवारी २०२० पूर्वी पाचपावली पोलीस ठाण्यात प्रवासाच्या तिकिटांच्या प्रती द्यायच्या आहेत व सुरक्षा म्हणून न्यायालयात एक लाख रुपये जमा करायचे आहेत. हनीसिंगच्या पुढच्या अर्जावर या अटी व शर्तीचे पालन झाले तरच विचार केला जाईल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हनीसिंगतर्फे अ‍ॅड. अतुल पांडे, तक्रारकर्ते जब्बलतर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू तर, सरकारतर्फे अ‍ॅड. अर्चना नायर यांनी कामकाज पाहिले.अश्लील गाणी गाण्याचा आरोपहनीसिंगवर अश्लील गाणी गाण्याचा आरोप आहे. व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २७ आॅक्टोबर २०१५ रोजी हनीसिंगला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. आदेशातील शर्तीनुसार हनीसिंग न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे तो याकरिता न्यायालयात अर्ज दाखल करतो.

टॅग्स :Honey Singhहनी सिंहCourtन्यायालय