शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

 नागपुरात सात रुग्णांची ‘कोविड’वर मात; कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 9:59 PM

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेयो) उपचार घेत सात रुग्णांनी कोविडवर मात केली. कोरोनामुक्त झालेल्यांना मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३६ झाली आहे.

ठळक मुद्देमेयोने टाळ्या वाजवून दिला निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेयो) उपचार घेत सात रुग्णांनी कोविडवर मात केली. कोरोनामुक्त झालेल्यांना मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. विशेष म्हणेजे, सोमवारी आठ आणि आज सात असे दोन दिवसात १५ रुग्ण बरे झाल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३३ झाली आहे. यातील बहुसंख्य रुग्णांना लक्षणे नाहीत. यामुळे सध्यातरी कुणाला व्हेंटिलेटरची गरज पडली नाही. मेडिकलमधील चार रुग्ण सोडल्यास इतरांना क्रिटीकल केअरचीही गरज पडलेली नाही. यामुळे १४दिवसांत नमुने निगेटिव्ह येऊन रुग्ण घरी जात असल्याने रुग्णांसोबत डॉक्टर, परिचारिका व कर्मचऱ्यांमध्ये समाधानाचा भाव आहे. मंगळवारी ३८, २४ व १७ वर्षीय पुरुष रुग्णाला मेयोतून घरी सोडण्यात आले. हे तिनही रुग्ण जबरलपूर येथील रहिवासी आहेत. १३ एप्रिल रोजी त्यांना मोमीनपुरा येथून आमदार निवासात क्वारंटाइन करण्यात आले होते. १७ एप्रिल रोजी या तिघांचा नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे मेयोमध्ये दाखल करण्यात आले. सतरंजीपुºयातील २८वर्षीय पुरुष, ४५, ४५ व ३८वषीय महिला यांचेही नमुने पॉझिटिव्ह आले होते. १४ दिवसांच्या उपचारानंतर २५ आणि २७ एप्रिल रोजी तपासण्यात आलेले नमुने निगेटिव्ह आले. यामुळे या सातही रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सलग दुसºया दिवशी सात रुग्ण रुग्णालयातून घरी जात असल्याने मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, नोडल अधिकारी डॉ. रवी चव्हाण, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. सागर पांडे, औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोत्तमा पराते व मेट्रन साधना गावंडे यांनी कोविड वॉर्डात सेवा देणाऱ्यांचे कौतुक केले. या रुग्णांसह मेयोतून आतापर्यंत १९ तर मेडिकलमधून १७रुग्ण असे एकूण ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या