लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या २४ तासांपासून नागपुरातील शीतलहर कायम आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि रात्री नागपूरसह अन्य जिल्ह्यात पाऊस झाला. त्यामुळे गारठा अधिकच वाढला असून, ही शीतलहर पुढचे २४ तास कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. नववर्षाचा पहिलाच दिवस पावसाचा ठरला. नागपूर शहरात दिवसा पाऊस आला. रात्रीही पावसाने उसंत घेतली नाही. रात्री सुमारे १२ वाजतानंतर आलेला पाऊस रात्री पाऊण तासापर्यंत सुरू होता. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्यांना आपल्या आनंदाला आवर घालावा लागला. ३१ डिसेंबरच्या रात्री केवळ नागपूर शहरातच नव्हे तर विदर्भातील अन्य जिल्ह्यातही हलक्या आणि मध्यम हलक्या पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद वर्धा जिल्ह्यात १०.४ मिमी झाली असून, त्यापाठोपाठ नागपूर शहरात ८.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावतीमध्ये ३.८ मिमी पाऊस पडला तर ब्रह्मपुरीध्ये २.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.मागील २४ तासात तापमानाचा पारा बराच खालावला आहे. पाऊस पडून गेल्याने थंडी वाढली. त्यामुळे ही शीतलहर पसरली आहे. हवामान खात्याने मागील १२ तासात पावसासह गारांचा इशारा दिला होता. मात्र बुधवारी दिवसभर पाऊस पडला नाही. ढगाळी वातावरण सायंकाळर्यंत कायम होते. येत्या १२ तासानंतर ढगाळी वातावरण दूर झाल्यावर थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.गेल्या २४ तासांमध्ये नागपुरातील कमाल वातावरणात बदल झाला असून, तापमान २.९ अंशाने घसरले आहे. शहरातील कमाल तापमानात २३.१ अंश सेल्सिअसने तर किमान तापमानात ०.४ ने घट झाली आहे. वर्ध्यामध्येही पारा २२ अंशावरून ३ ने खालावला आहे. अमरावतीमध्ये कमाल तापमानात ३.८ ने घट झाली. चंद्रपुरात ०.४ अंशाने, तर यवतमाळात ०.५ ने कमाल तापमानात घट झाली आहे.
नागपूर कुडकुडले, शीतलहर कायमच : पावसाने वातावरण थंडावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 9:03 PM
गेल्या २४ तासांपासून नागपुरातील शीतलहर कायम आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आणि रात्री नागपूरसह अन्य जिल्ह्यात पाऊस झाला. त्यामुळे गारठा अधिकच वाढला असून, ही शीतलहर पुढचे २४ तास कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
ठळक मुद्देवर्धा, नागपुरात हलक्या पावसाची नोंद