शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

नागपूर : दुचाकीवरून सात लाखांच्या एमडीची स्मगलिंग, तीन आरोपींना अटक

By योगेश पांडे | Published: June 19, 2024 3:07 PM

दुचाकीवरून सात लाखांच्या एमडीची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. 

नागपूर : दुचाकीवरून सात लाखांच्या एमडीची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. उमरेड मार्गावरील पवनपुत्र नगर येथील रहिवासी व सख्खे भाऊ रोहन सुरेश ढाकुलकर (२८), शुभम सुरेश ढाकूलकर (३१) तसेच वेदांत विकास ढाकुलकर (२४, नेताजी मार्केट, सिताबर्डी) अशी आरोपींची नावे आहेत. 

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवनपुत्र नगर परिसरात दुचाकीवरून एमडी नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली होती. मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून एमएच ३१ एफव्ही ८४२७ या दुचाकीवर ट्रीपलसीट जाणाऱ्या आरोपींना थांबविले. त्यांची झडती घेतली असता डिक्कीत ७१.११ ग्रॅम एमडी पावडर आढळली. त्या पावडरची किंमत ७.११ लाख इतकी होती. पोलिसांनी आरोपींकडून दुचाकी, वजनकाटा व रोख २२ हजार असा ८.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना विचारणा केली असता त्यानी तबरेज आलम उर्फ टीपू उर्फ अफरोज आलम याच्या मदतीने एमडीची खरेदी विक्री करत असल्याची कबुली दिली. तिघांविरोधातही हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना तेथील पथकाच्या हवाली करण्यात आले. तर तबरेज आलमचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक कविता ईसारकर, सचिन बढिये, लक्ष्मण चौरे, अजय पौनीकर, शेषराव राऊत, अश्विन मांगे, कुणाल मसराम, समीर शेख, प्रकाश माथनकर, नितीन वासने, पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

अगोदर आरोपींच्या घराची झडती 

सापळा रचून आरोपींना अटक करण्याअगोदर पोलिसांनी रोहन व शुभम यांच्या घराची झडती घेतली. तेथे काहीही न आढळल्याने त्यांनी आरोपींचा चुलतभाऊ वेदांतच्या नेताजी मार्केट येथील घरीदेखील शोध घेतला. अखेर आरोपी पवनपुत्र नगर परिसरातच आढळले. तीनही आरोपी एकमेकांचे नातेवाईकच आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी