शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
2
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकूण टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
3
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
4
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
5
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
6
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
7
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
8
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
10
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
11
'इस्रायलने इराणवर हल्ले करावे, पण...', जो बायडेन यांचा बेंजामन नेतन्याहूंना सल्ला
12
धोनी, विराट की रोहित... भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार कोण? 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलने दिलं उत्तर
13
तिरुपती मंदिराबाबत नवा वाद, प्रसादात सापडले किडे; मंदीर प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
14
"छत्रपतींच्या स्मारकालाच अडचणी का येतात?", रोहित पवार काय म्हणाले?
15
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
16
INDW vs PAKW : रेणुकाचा कमालीचा इन-स्विंग चेंडू; पाक बॅटर फक्त बघतच राहिली अन्..
17
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
18
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
19
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
20
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI

नागपुरात साखर ३५ रुपयांवर! दिवाळीनंतर क्विंटलमागे १५० रुपयांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:29 AM

गेल्या वर्षी ठोक बाजारात प्रति किलो ३८ रुपयांवर पोहोचलेले साखरेचे भाव यावर्षी ३३ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पण किरकोळमध्ये साखर ३५ रुपये किलो विकली जात आहे. स्वस्ताईमुळे ग्राहकांना साखरेचा गोडवा अनुभवायला मिळत आहे.

ठळक मुद्देमुबलक उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या वर्षी ठोक बाजारात प्रति किलो ३८ रुपयांवर पोहोचलेले साखरेचे भाव यावर्षी ३३ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. पण किरकोळमध्ये साखर ३५ रुपये किलो विकली जात आहे. स्वस्ताईमुळे ग्राहकांना साखरेचा गोडवा अनुभवायला मिळत आहे.ठोक व्यापारी रामदास वजानी यांनी सांगितले की, दिवाळीत ठोकमध्ये भाव प्रति क्विंटल ३,५०० रुपयांवर होते, पण आता जवळपास १५० रुपयांची घट झाली आहे. यावर्षी साखरेचे उत्पादन जास्त आहे. मिल संचालकांकडे ऊस उत्पादकांकडे पैसे देण्यास निधी नाही. त्यामुळे कमी भावातच विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांना उसाची योग्य किंमत मिळावी आणि साखरेचे भाव २३५० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आल्यानंतर केंद्र सरकारने जूनमध्ये साखरेची किमान किंमत २९०० रुपये अशी निश्चित केली होती. त्यानंतर भावात सुधारणा झाली. सध्या मिल क्वालिटी भाव २९५० ते ३००० रुपये आहेत. त्यात पाच टक्के जीएसटी आणि भाडे असे जवळपास ३०० रुपये जोडून नागपुरात ठोक व्यापाऱ्यांना साखर ३२०० ते ३३०० येत आहेत.इतवारी ठोक बाजारात एम क्वालिटीच्या साखरेचे भाव प्रति क्विंटल भाव ३३७० ते ३४०० रुपये आणि साखर-एसचे भाव ३२८० ते ३३३० रुपये आहेत. पण किरकोळमध्ये ३५ ते ३६ रुपये विकल्या जात आहे. भाव कमी झाल्यानंतरही बाजारात ग्राहकी नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे साखर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. वजानी म्हणाले, केंद्र सरकारने आॅक्टेबरमध्ये २१ लाख टन आणि नोव्हेंबरला २२ लाख टन असा जादा कोटा विक्रीसाठी निश्चित केला होता. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या भावात दोन्ही महिन्यात थोडीशी वाढ झाली. पण दिवाळी संपताच साखरेच्या भावात पुन्हा घसरण सुरू झाली. सध्या बाजारपेठेत साखरेची मागणीही घटली आहे.

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेnagpurनागपूर