- कमलेश वानखेडे नागपूर - सत्तेत असणाऱ्या माणसाने समस्या सोडवायच्या असतात. सत्तेत असणाऱ्यांनी समस्या मांडायच्या नसतात. अलीकडे सत्तेतील माणसं समस्या मांडत आहेत. त्यामुळे सत्तेत कशाला राहता, असा उलट सवाल करीत वडेट्टीवार यांनी भूजबळ यांच्यावर निशाना साधला.
छगन भुजबळ यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, हे त्यांनाच विचारा मला माहीत नाही. दाखले देऊन झाले आहे. भुजबळ असू दे की जरांगे पाटील असू दे हिमनगाच्या टोकासारखी भूमिका कशी मांडणार. गावात भांडण तंटे झाले तर त्याला ते जबाबदार राहतील, असा थेट ठपकाही वडेट्टीवार यांनी ठेवला.सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आपला हक्क मांडत असताना दोन समाजामध्ये टोकाची भूमिका घेऊन दरी निर्माण होईल याला माझे समर्थन नाही. ओबीसीच्या हक्काचे मागायचे तेवढ्यासाठी आम्ही लढणार. दोन समाजात दुही निर्माण होईल, अशा प्रकारची टोकाची भूमिका जर कुणी मांडत असेल तर आम्हाला त्यांचा विरोध आहे. त्याला आम्ही समर्थन देणार नाही.
माझ्या पक्षाची भूमिका आहे ओबीसीच्या हक्कासाठी लढणे हे माझे काम आहे म्हणजे वक्तव्य त्यांनी त्याला माझा समर्थन राहणार नाही. शरद पवार यांच्या भेटीचा विषय नाही. पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. माझ्या पक्षाचे नेते नाहीत. मी माझ्या पक्षाची भूमिका ओबीसी कार्यकर्ता म्हणून मांडत राहील. कोण कुठे आहे आणि कोण का ती भूमिका मांडत आहे हे लवकर उघड पडेल असा मला विश्वास आहे.