शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

Nagpur: कळमना पोलीस चौकीत जुगार खेळणारे ‘ते’ दोन पोलीस निलंबित, वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ असल्याचे उघड

By दयानंद पाईकराव | Updated: August 19, 2024 16:27 IST

Nagpur Police News: जुना कामठी रोडवरील कळमना पोलीस चौकीत जुगार खेळणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांना झोन ५ चे पोलीस उपायुक्त अनिकेत कदम यांनी सोमवारी तडकाफडकी निलंबित केले.

- दयानंद पाईकरावनागपूर - जुना कामठी रोडवरील कळमना पोलीस चौकीत जुगार खेळणाऱ्या दोन पोलीस अंमलदारांना झोन ५ चे पोलीस उपायुक्त अनिकेत कदम यांनी सोमवारी तडकाफडकी निलंबित केले. दरम्यान जुगार खेळताना दोन निलंबीत पोलिसांव्यतिरिक्त आणखी किती पोलीस होते ? याचा शोध घेण्यासाठी या प्रकरणाची चौकशी कामठी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

मनोज घाडगे आणि भुषण शाहु साकडे अशी निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस अंमलदारांची नावे आहेत. कळमना पोलीस ठाण्यात दोन पोलीस अंमलदार वर्दी घालून जुगार खेळत असल्याचा व सिगारेट पित असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे नागपूर शहर पोलीस विभागात खळबळ उडाली. परंतु हा व्हिडीओ कळमना पोलीस ठाण्यातील नसून तो जुना कामठी मार्गावरील कळमना पोलीस चौकीतील असल्याचे उघड झाले आहे. झोन ५ चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी या पोलीस चौकीला भेट देऊन पाहणी केली. ही पोलीस चौकी एक सिंगल रूम आहे. तेथे तक्रार देण्यासाठी कोणीही जात नाही. व्हिडीओत जुगार खेळताना घाडगे आणि भुषण शाहु साकडे यांच्या सोबत आणखी काही जणांचे आवाज ऐकु येत असल्यामुळे यात आणखी काही पोलीस सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी या प्रकरणाचा तपास कामठी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्याकडे सोपविला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने जुगार खेळणाऱ्या दोन अंमलदारांना निलंबीत केल्यामुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. व्हिडीओ वर्षभरापूर्वीचाव्हिडीओत जुगार खेळताना दिसत असलेले बीट मार्शल घाडगे आणि भुषण शाहु साकडे हे वर्षभरापूर्वी बीट मार्शल होते. त्यामुळे हा व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा असल्याचे उघड झाले आहे. दोघेही अंमलदार जुगार कळमना पोलीस चौकीत खेळत होते. या चौकीत कोणीही तक्रार करण्यासाठी जात नाही. त्यामुळे हा व्हिडीओ पोलीस विभागातील कोणीतरी बनविला असून वर्षभरानंतर तो व्हायरल केल्याचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. शिवाय जुगार खेळताना दिसत असलेल्या अंमलदारांच्या चेहऱ्यातही बदल झाल्याचे दिसत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांचेही निलंबन, सखोल चौकशी होणारपोलिसांचा गणवेश घालून पोलीस चौकीत जुगार खेळणे हा गुन्हा आहे. त्यामुळे संबंधीतांविरुद्ध तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जुगार खेळताना आणखी पोलीस होते काय याची सखोल चौकशी करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली आहे.’- निकेतन कदम(पोलीस उपायुक्त, परिमंडळ ५, नागपूर शहर) गैरवर्तन करताना आढळल्यास कडक कारवाईगणवेश घालून जुगार खेळणे हा गुन्हा असून असे गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. याबाबत कळमना ठाण्यातील सर्व पोलिसांना गंभीरपणे ताकिद देण्यात आली आहे.’- गोकुळ महाजन |(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळमना पोलीस स्टेशन)

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस