लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नारळी पौर्णिमेच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी जाणाऱ्या एका बहिणीवर काळाने झडप घातली. खापरखेडा मुख्य बाजारपेठेत दहाचाकी ट्रकच्या धडकेत घटनास्थळावर तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी आठवडी बाजाराच्या दिवशी घडली. यावेळी घटनास्थळावर तणाव निर्माण झाला होता. यावेळी मृताच्या नातेवाईकांची अवस्था बघून स्थानिक नागरिकांचा रोष अनावर झाला.नागरिकांनी पोलिसांची कॉलर सुद्धा पकडली. मृत महिलेचे नाव सुनिता सुरेश गेडाम (४०) रा. वाघोडा तालुका पारशिवनी असे असून ती आपले पती सुरेश मुलगी कल्याणी हिच्या सोबत दुचाकी क्र मांक एम. एच. ४० ए. ई.१०४९ ने खापरखेडा येथील मुख्य बाजारपेठेत राखी पोर्णिमेचे साहित्य खरेदी करून दहेगाव रंगारी येथे राखी बांधण्यासाठी तिचा भाऊ चौधरी यांच्याकडे जात होती. दरम्यान मुख्य बाजारपेठेत बोरकर किराणा दुकानासमोर बाजाराची दुकाने रस्त्यावर थाटली होती. रस्त्यावरच्या राखीच्या दुकानातून राखी खरेदी करून रस्त्याकडे वळून दुचाकी वाहनावर बसण्याच्या तयारीत असताना कोळशाने ओव्हरलोड दहा चाकी ट्रक क्र मांक एम. एच. ४० वाय ३६५५ वर जाऊन धडकली. सदर ट्रकच्या मागच्या चाकात मृत सुनिता आल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर अपघातात सुनिताच्या मेंदूचा अक्षरश: चुराडा झाला होता.घटनास्थळ खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असून घटनास्थळावर पोलिसांना पोहचण्यास उशीर झाल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी मुख्य बाजारपेठ आठवडी बाजारात पोलिसांचे योग्य नियोजन नसल्यामुळे पोलिसाविरोधात रोष व्यक्त करीत जोपर्यंत घटनास्थळ पंचनामा करीत तोपर्यंत प्रेत हलू देणार नाही असा आक्र मक पवित्रा नागरिकांनी घेतल्यामुळे काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.अखेर नागरिकांची समजूत घालून सदर प्रेत खापरखेडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. खापरखेडा पोलिसांनी ट्रक चालक साहेबराव रामाजी इरपाची (४०) रा.सिल्लेवाडा याला अटक केली आहे. पोलिसांनी सुनिताचे पार्थिव शवविच्छेदन करण्याकरिता नागपूर येथील शासकीय रु ग्णालयात हलविण्यात आले.
त्यांचे अश्रू अनावरमृत सुनिता आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जात होती. नारळ पौर्णिमेला लागणारे साहित्य खापरखेडा येथील मुख्य बाजारपेठेत खरेदी करीत होती. यादरम्यान काळाने झडप घेतली. घटनास्थळावर सुनीताचा पती सुरेश व मुलगी कल्याणी धाय मोकलून रडत होते. सदर दृश्य पाहिल्यानंतर अनेक नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.
पोलीस ठाण्यासमोर नागरिकांची गर्दीघटनास्थळावर तणाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी नागरिकांची समजूत काढून मृत सुनिताचे पार्थिव पोलीस ठाण्यात आणले. यावेळी नागरिकांनी वाहतूक पोलिसांवर कार्यवाही करण्याची मागणी करून वाहनचालक व ट्रकमालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.